आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रक-कारचा अपघात; एकाच कुटुंबातील सात जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भरधाव ट्रक आणि झायलो कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील एकाच कुटुंबातील 7 जण जागीच ठार झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरपासून काही अंतरावर असलेल्या नवसाळ फाट्याजवळ शनिवारी सकाळी घडली. रामदास दोडके (65), उषा दोडके (60), भूषण दोडके (30), नम्रता दोडके (28), सुषमा दोडके (22), मनीष दोडके (33) व कारचा चालक ओमप्रकाश अशी मृतांची नावे आहेत.

नाशिक येथील दोडके कुटुंबातील सहा जण शुक्रवारी सायंकाळी भूषण दोडके यांच्या साखरपुड्यासाठी नाशिकहून झायलो कारने यवतमाळकडे जात होते. या कार्यक्रमासाठी अमरावतीच्या काही नातेवाइकांना सोबत घेण्यासाठी ते मूर्तिजापूरहून अमरावतीकडे जात असताना समोरून येणारा एक मालवाहू ट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील सात जण जागीच ठार झाले. घटनेनंतर सर्वांचे मृतदेह मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. दोडके कुटुंबीय हे मूळचे अमरावती येथील असून ते नोकरीनिमित्त नाशिकला स्थायिक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेनंतर दोडके यांच्या अमरावती येथील नातेवाइकांनी मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार वैशाली देवकर, अकोल्याचे जिल्हा अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी भेट देऊन तपास यंत्रणा कार्यान्वित केली. याप्रकरणी ठाणेदार सुनील सोनवणे, माना येथील ठाणेदार रामकृष्ण मळघणे पुढील तपास करीत आहेत.