आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sexual Victimization,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्या' मागासवर्गीय युवतीस न्याय मिळावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- न्युखंडेलवाल अंलकार केंद्रात कार्यरत मागासवर्गीय युवतीने मोहनिष खंडेलवाल याच्या विरोधात सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात लैगिक अत्याचारा विरुद्ध तक्रार नोंदवली. परंतु, मोहनीष खंडेलवाल याला अटकपूर्व जामिन मिळाला. त्यामुळे या युवतीला अद्यापही न्याय मिळाला नाही. या युवतीला न्याय मिळवुन द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने शहर पोलिस उपअधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
युवतीने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर मोहनिष खंडेलवाल याच्या विरुद्ध अजामिनपात्र गुन्हा दाखल झाला. परंतु गैर अर्जदारास अटक पूर्व जामिन मिळाला. मोहनीष खंडेलवाल त्याच्या कुटुंबियांनी न्यायालय परिसरात या मागासर्गीय युवतीला जातीवाचक शिवीगाळ केली. या विरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात अॅक्ट्रासिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आल्यानंतरही तो मोकाट फिरतो आहे. त्यामुळे युवतीची फसवणुक करणाऱ्या या मोहनीष खंडेलवाल याच्यावर कारवाई करुन युवतीला न्याय मिळवुन द्यावा, अशी मागणी मराठा महासंघाचे योगेश थोरात, विशाल बकाल, श्रीकांत फुले, मंगेश टापरे,शाम पाकधुने, सुधीर काटीकर यांनी निवेदनातून केली आहे.