आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Yogesh Darade Funeral Ceremony In Buldhana

शहीद दराडेंवर आज अंत्यसंस्कार; मांडवा येथे पोहोचणार पार्थिव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - काश्मीरमध्ये शहीद झालेले लोणार तालुक्यातील जवान योगेश दराडे यांच्या पार्थिवावर 3 जानेवारीला मांडवा येथे मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पार्थिव रात्री साडेआठ वाजता दिल्लीवरून मुंबई येथे पोहोचले असून, रस्ता मार्गे जानेवारीला सकाळी ते मांडवा येथे पोहोचणार आहे. तीन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थितीत योगेश दराडे यांना वीरमरण आले. मात्र, तेथील हवामान खराब असल्याने तेथून त्याचे पार्थिव लवकर दिल्ली येथे आणता आले नव्हते. दोन जानेवारीला सायंकाळी दिल्ली येथून शहीद जवान योगेश दराडे यांचे पार्थिव विमानाद्वारे रात्री साडेआठ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
अंत्यविधीसाठी मेहकरचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर बेंडे, तहसीलदार निर्भय जैन, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी दळवी, कल्याणसिंग मुडे अन्य शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. म्यान, पार्थिवासोबत सियाचीनमधील नायब सुभेदार कांबळे असून, मांडवा येथे पोहोचल्यानंतर योगेश दराडे यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करतील.