आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi, Akola

कृषिमंत्री शरद पवार उद्या अकोल्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे अकोला येथील शिवणी विमानतळावर 29 मार्च रोजी आगमन होणार आहे. अमरावती व बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर ते मोटारीने अमरावती येथे रवाना होतील. अमरावती येथील नवनीत कौर राणा यांच्या सभेला सकाळी 11 वाजता अचलपूर, दुपारी अंजनगाव सुर्जी येथे होणार्‍या सभेला ते उपस्थित राहतील. त्यानंतर पुन्हा ते शेगाव येथे अकोलामार्गे जाणार आहेत. सायंकाळी 5 वाजता बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कृष्णराव इंगळे यांच्या शेगाव येथील प्रचारसभेलाही ते उपस्थित राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळवले.