आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सदन बनले ‘आसरा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात असलेले शेतकरी सदन हे अभ्यासदौर्‍याकरिता येणार्‍या शेतकर्‍यांसह शेतीविषयक प्रशिक्षणासाठी येणार्‍या अभ्यासकासाठी ‘आसरा’ बनले आहे, अशी माहिती शेतकरी सदनचे प्रभारी अधिकारी किशोर बिडवे यांनी 27 सप्टेंबरला दिली.

विस्तार शिक्षण संचालक यांच्या नियंत्रणात असलेले हे शेतकरी सदन शेतकरी तसेच अभ्यासकांसाठी वरदान ठरत आहे. डॉ. विजय माहोरकर यांचे शेतकरी सदनात आलेल्या पाहुण्यांकडे विशेष लक्ष असते. कृषी विद्यापीठात दैनंदिन अनेक प्रकारचे कृषीविषयक शिबिरे तसेच कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनासह, कृषी विभागामार्फत अनेक कार्यक्रम घेतले जातात. यासाठी महाराष्ट्रातून शेतकरी व अभ्यासक येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे यांनी शेतकरी सदन असावे, ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात साकारली, याचा फायदा आज अनेक शेतकरी घेत आहेत. नाममात्र शुल्क आकारून शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात येतो. या ठिकाणी शेतकर्‍यांची नेहमीच गर्दी होत असते.

व्हीआयपी सूटला ‘नेम’
कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या शेतकरी सदनातील खोल्या ह्या विशिष्ट नावाने दर्शवल्या आहेत. यामध्ये ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, रायगड, सिंहगड, प्रतापगड असे वैशिष्ट्यपूर्ण नावे देण्यात आली आहेत. त्यात आवश्यक सुविधाही आहेत.

42 हजारांचा खर्च
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या शेतकरी सदनाच्या देखरेखीवर व व्यवस्थापनावर जवळपास महिन्याकाठी 42 हजार रुपये खर्च होतो, तर 45 ते 50 हजार रुपयांची आमदनी प्राप्त होते.

आरामदायी सुविधा
शेतकरी सदनच्या आवारातच वाचन कक्ष, ध्यान केंद्र उपलब्ध आहे. शेतकर्‍यांना किंवा अभ्यासकांना आवारातच या सुविधा सकाळ संध्याकाळ उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे येथे शेतकर्‍यांची वर्दळ असते.

सदैव दक्ष
शेतकरी तसेच अभ्यास दौर्‍याकरिता आलेल्या अभ्यासकांना शेतकरी सदनमध्ये आलेल्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सदैव आम्ही दक्ष राहत असतो. किशोर बिडवे, प्रभारी अधिकारी, शेतकरी सदन.