आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांच्या पुतळा उभारणीला मान्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो संग्रहित

यवतमाळ - शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामाला शासकीय मान्यता मिळाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढय़ाला अखेर यश आले आहे. येत्या काही दिवसांतच या पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू होणार असल्याची माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. ना. गो. तावडे यांनी मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

यवतमाळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या शिवाजी महाराज पुतळा समितीने सुमारे 1988 सालापासुन या कामासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी या समितीचे गठण करुन पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व ना-हरकत प्रमाणपत्रे आणि इतर अटींची पुर्तता करण्यासंदर्भात समितीने काम सुरू केले. त्यात सुरवातीला पुतळ्यासाठी जागा उपलब्ध होण्यास फार विलंब लागला.
अखेर गार्डन रोडवर तयार करण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्रे गोळा करताना मोठी कसरत करावी लागली. अखेर तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख आणि दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांनी नाट्यगृहाच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय स्तरावरील सर्व ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहकार्य केले.

नेत्यांचे सहकार्य अत्यावश्यक
4पुतळा उभारण्यासाठी पालिका प्रशासन सर्व खर्च करणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक निधी जसजसा उपलब्ध होईल तसतसे हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक नेत्यांनी यवतमाळकरांच्या इच्छेचा आदर करीत त्यांच्या विकास निधीतून सहकार्य केल्यास पुतळा उभारण्याचे काम लवकर पुर्णत्वास येईल. डॉ. ना. गो. तायडे, अध्यक्ष, शिवाजी महाराज पुतळा समिती.