आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवणी’साठी ‘टेक ऑफ’ दूरच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिवणी विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीचा प्रo्न निकाली लागल्याचा गवगवा नेत्यांकडून करण्यात येत असला तरी, शिवणी विमानतळावरून ‘टेक ऑफ’ आणखी कोसो दूरच आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विमानतळासाठी पश्चिमेऐवजी पूर्वेकडील हवी तेवढी जागा घेण्याचा ठराव झाला आहे. त्यामुळे अद्यापही विमानतळासाठीच्या जागेचा प्रo्न सुटलेला नाही.

शिवणी विमानतळाची धावपट्टी 1400 मीटर वरून 1800 मीटर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाची 54 हेक्टर जागा विमानतळाला पाहिजे आहे. मात्र, कृषी विद्यापीठाच्या इमारती, संशोधन कार्य व वसतिगृह प्रभावित होणार असल्याने ती जमीन देण्यास विद्यापीठाने अद्यापही ‘ग्रीन सिग्नल’ दिलेला नाही. बुधवारी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीमध्ये विमानतळाच्या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा झाली. धावपट्टीच्या विस्तारीकरणाला विरोध नसल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. पश्चिमेकडील अत्यावश्यक व उर्वरित पूर्वेकडील लागेल तेवढी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. असा ठराव 2012 मध्येदेखील घेण्यात आला होता. धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी पश्चिमेकडील जागा आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाने पूर्वेकडील जागा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जमिनीचा तिढा कायम आहे. विमानतळासाठी पूर्वेकडील जागा घेतल्यास संपूर्ण धावपट्टी नव्याने बनवावी लागेल. त्यासाठी पुन्हा मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे विमानतळाचा मुद्दा सध्या तरी अधांतरीच आहे.

विभागीय आयुक्तांचा आढावा
शिवणी विमानतळासाठी कृषी विद्यापीठाची जमीन देण्यासंदर्भात तिढा कायम असताना शनिवारी विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी कृषी विद्यापीठात बैठक घेऊन विद्यापीठाने जमिनीचा निर्णय घ्यावा, असे बैठकीत सांगितले. विशेष म्हणजे या बैठकीत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू देखील उपस्थित नव्हते.