आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या जमिनीवरच डोळा का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘शिवणी विमानतळ धावपट्टीच्या विस्तारासाठी केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीवरच डोळा का ?,’ असा प्रश्न कृषी विद्यापीठाच्या स्थापना आंदोलनातील सक्रिय नेते चंद्रशेखर गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रश्नी कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या भावना जाणून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या संघर्षात चंद्रशेखर गाडगीळ आहेत. त्याकरिता कारागृहाची शिक्षा त्यांनी भोगली आहे. त्याच संघर्षातून विद्यापीठाची निर्मिती झाली. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या बलिदानातून येथील कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली. ज्यांनी या संघर्षात पुढाकार घेतला नाही, ते आता विमानतळासाठी आग्रही असल्याचा आरोप चंद्रशेखर गाडगीळ यांनी केला आहे.विद्यापीठाची निर्मिती अकोल्यात संघर्षातून झाली आहे.

अकोला महानगराच्या विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न महानगर आणि पश्चिम विदर्भाकरिता महत्त्वाचा असला तरी, कृषी विद्यापीठाच्या उपयुक्त जमिनीवरच विमानतळ करण्याचा हट्ट का, असा प्रश्न चंद्रशेखर गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. विदर्भातील सर्वांनी कृषी विद्यापीठाची जमीन वाचवण्यासाठी लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी विद्यापीठास अनावश्यक असलेल्या जमिनीचा विचार विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.