आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिवसेनेचा मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकर्‍यांना एकरी पन्नास हजार रुपये द्या यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खासदार प्रतापराव जाधव यांचे जनसंपर्क कार्यालयावरून हा मोर्चा निघाला. संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, भोंडे सरकार चौक, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला. खासदार प्रतापराव जाधव, आमदार विजयराज शिंदे, आमदार संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुखद्वय दत्ता पाटील, धीरज लिंगाडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे आदींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून वगळलेल्या बुलडाणा तालुक्याचा टंचाई घोषित तालुक्यांमध्ये समावेश करावा, शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्यात यावी. पेरणीचा कालावधी संपल्याच्या कारणावरून पीक विमा काढण्यास बँकांनी नकार दर्शवला. त्यामुळे पीक विमा काढण्याची मुदत वाढवून देण्यात यावी. पीक विम्याचा हप्ता भरण्याची सक्ती करावी. बुलडाणा व मोताळा तालुक्यामधील अनेक नागरिक घरकुलांसाठी ओरड या माेर्चात जिल्हा उपप्रमुख शांताराम जगताप, दिलीप देशमुख, वसंतराव भोजने, अविनाश दळवी, जािलंदर बुधवत, अशोक इंगळे, अर्जुन दांडगे, विठ्ठल येवले, हरीश सिनकर, रामेश्वर पाटील, भोजराज पाटील, संजय धंदर, पुरुषोत्तम लखोटिया, पुरुषोत्तम नारखेडे, गजेंद्र दांदडे, गोविंदा खमकर, मुन्ना बेगाणी, हेमंत खेडेकर, राजेश ठोंबरे, समाधान राऊत , सुभाष पवार, शरद टेकाळे, नामदेव पाटील, वैशाली ठाकरे, शोभा पाटील, नीलेश राठोड, किरण देशपांडे, प्रा सुभाष लहाने, गजानन देशमुख, प्रकाश सरडकर, ज्ञानदेव मानकर, अर्जुन नेमाडे, दादाराव खाडे, प्रा. बळीराम मापारी, सुरेश वावगे, सुरेश वाळुकार, बाळासाहेब धोरण, संतोष दांडगे, शांताराम दाणे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, अमरदीप देशमुख, अनिल जगताप, समंता इंगळे, बबनराव टेकाळे, माणिकराव सावळे, राज साेनोने, आेमसिंग राजपूत, शशिकांत खेडेकर यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.