आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने जाळला खडसेंचा पुतळा, खडसेंच्या विरोधात धिंग्रा चौकात घोषणाबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मराठी शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्या विरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मंगळवारी मदनलाल धिंग्रा चौकात शिवसेनेने एकनाथ खडसे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड राग आहे. त्यातच राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी मराठी शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक करण्याची घोषणा करून नव्या वादाला तोंड फोडले. त्याचा िनषेध म्हणून सोमवारी विधिमंडळामध्ये एकनाथ खडसे यांचा शिवसेनेच्या आमदारांनी निषेध नोंदवला. त्याचे पडसाद अकोल्यात उमटले. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता शिवसैनिकांनी उपमहापौर विनोद मापारी यांच्या नेतृत्वात बसस्थानकासमोरील मदनलाल धिंग्रा चौकात प्रचंड नारेबाजी केली एकनाथ खडसे हाय हाय, निम का पत्ता कडवा है, एकनाथ खडसे*** है , मियाँ एकनाथ खडसे, अशा घोषणा दिल्‍या. या वेळी बसस्थानक चौकातील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. यावेळी उपमहापौर विनोद मापारी, शहरप्रमुख तरुण बगेरे, उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, योगेश अग्रवाल, गणेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

निषेध व्यक्त केला
शिवसेचेनेते आमदार दिवाकर रावते यांनी सोमवारी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या आदेशानुसार शिवसेना शहर शाखेच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा िनषेध म्हणून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन आम्हीसुद्धा निषेध व्यक्त केला आहे. तरुणबगेरे, शहरप्रमुख शिवसेना