आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shop Bord In English Language Issue At Akola, Divya Marathi

शहरातील अनेक प्रतिष्ठानांचे नामफलक इंग्रजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुकान, प्रतिष्ठानांवरील नामफलक मराठीत असावे, असे परिपत्रक राज्यातील महापालिकांना शासनाने पाठवले आहे. परंतु, मनपा याबाबत अनभिज्ञ असल्याने शहरातील कित्येक दुकानांवर इंग्रजी नामफलक आढळतात. या परिपत्रकाबाबत मनपा परवाना विभागाच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता, त्यांनी असा कोणताही नियम नाही, असे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार व्यवसायासाठी मनपाच्या परवाना विभागामार्फत परवाना दिला जातो. येथील महापालिकेच्या हद्दीत एकूण 350 प्रकारच्या व्यवसायांमधील एकूण 18 हजार व्यावसायिकांना परवाना विभागामार्फत परवाने दिले आहेत. यासाठी शासनाचे काही नियम आहेत. यामध्ये परवानाप्राप्त व्यावसायिकांच्या दुकानाचे नामफलक मराठीत असावे, असाही नियम आहे.
परंतु, शासनाच्या या नियमाची माहिती व्यावसायिकांसह मनपालादेखील नाही. त्यामुळे शहरातील अनेक दुकानांचे नामफलक इंग्रजीमध्ये आहेत. माहितीअभावी व्यवसायिकांकडून नियम मोडला जात आहे. मनपा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात करवसुलीसाठी विशेष शिबिर आयोजित क रते. व्यावसायिकदेखील यास प्रतिसाद देऊन करभरणा करतात. या वेळी परवाना विभागामार्फत व्यावसायीकांमध्ये शासकीय परिपत्रकाबाबत जनजागृती केली जात नाही.
शहरात सध्या 350 प्रकारचे व्यवसाय आहेत. यामध्ये किरकोळ व ठोक किराणा, बिअर बार, धान्य बाजार, मेडिकल स्टोअर्स, कटलरी दुकान, मांस विक्रेते आदीचा समावेश आहे. शहरातील दवाखान्यांचासुद्धा यात समावेश आहे.
मनसेला पडला विसर
दुकानांवरील मराठी नामफलकांच्या मुद्यावरुन राज्यात रान उठविणार्‍या महाराष्ट्र नव निर्माण सेनेला याचा विसर पडला आहे. महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम न घेतल्याने मनसेचे पदाधिकारी तुर्तास अडचणीत सापडले असून पक्ष पातळीवर हा कार्यक्रम न झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी इंग्रजीत पाट्यांचा वापर सुरु असताना मराठी च्या मुद्दावर रान उठविणारा मनसे गप्प का असा मुद्दा नागरीकांद्वारे विचारण्यात येता आहे.
प्रतिष्ठानांवरील मराठी नामफलक गायब
मराठी भाषेत नामफलकांचा नियम नाही
शहरात अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. व्यावसायिकांना परवाने देताना दुकानाचे नामफलक मराठीत असावे, असा कोणत्याच प्रकारच्या नियमाचा उल्लेख शासनाच्या परिपत्रकामध्ये नाही. शासनाने तसे परिपत्रक काढल्यास व्यावसायिकांना याबाबत सूचना देऊन कार्यवाही करण्यात येईल.’’ राजेंद्र गोतमारे, वाणिज्य करअधीक्षक परवाना विभाग मनपा, अकोला