आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेल्याच्या ‘हटेल’ची पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील डॉ. राजेश देशमुख यांच्या ‘हटेल’ या लघुपटाची चौथ्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली आहे. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान, पुण्यात होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये ही दाखवली जाणार आहे.
अकोल्यातील राजेश देशमुख हे व्यवसायाने डॉक्टर. आवड म्हणून ते क्वचित नाटकांमध्येदेखील काम करतात. गोवा येथे झालेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका व्यक्तीने हेल्मेट विषयावर मोबाइलच्या साहाय्याने शॉर्ट फिल्म तयार केली आणि त्याने पारितोषिकदेखील पटकावले. त्याची मुलाखत पाहिल्यानंतर डॉ. देशमुख यांनीदेखील शॉर्ट फिल्म बनवण्याचा ध्यास घेतला. मग, दिनेश गावंडे, रुपेश देशमुख, गणेश बुडूकले आणि काही मित्रांसोबत सुरू झाला त्यांचा लघुपट बनवण्याचा प्रवास. शॉर्ट फिल्म म्हणजे काय येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास कॅमेरा अँगल, स्क्रिप्टिंग, एडिटिंग, सब टायटलिंग, असे कितीतरी टप्प्यांवर अडखडला. मात्र, वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावून आले इंटरनेट आणि पुस्तके.
प्राथमिक अभ्यास झाल्यानंतर सुरू झाला खऱ्या अर्थाने लघुपट बनवण्याचा प्रवास. डॉ. देशमुख यांचे कथाकार मित्र दिनेश गावंडे यांच्या काही कथांचे वाचन झाल्यानंतर एक प्रयोग म्हणून ‘हटेल’चे काम हाती घेतले. या लघुपटात जवळपास १५ पात्र आहेत. त्यामुळे चित्रीकरणासाठी तारीख पे तारीख, अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आली. अखेर ३१ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ६.३० ते रात्री १० वाजे दरम्यान हा लघुपट एका स्ट्रोकमध्ये शूट करण्यात आला. एकीकडे सगळीकडे ३१ डिसेंबरचा जल्लोष होता, तर दुसरीकडे हे सर्व ध्येय वेडे हिंगणा गावात लघपुटाचे चित्रण करत होते. चित्रीकरण झाल्यानंतर एडिटिंगला जवळपास तीन महिने लागले आणि त्यानंतर या लघुपटाने यू-ट्युबवर हजेरी लावली. मार्च २०१४ रोजी ही शॉर्ट फिल्म यू ट्युबवर झळकली. त्याला आलेल्या प्रतिसादाने काही प्रमाणात का होईना, आपण यशस्वी झालो, असा विश्वास निर्माण झाला.
भावनिकटच : ग्रामीणभागातील दुष्काळग्रस्त शेतकरी चहाची टपरी टाकून जोड धंदा सुरू करतो. आर्थिक लाभासाठी तो व्यवसायात त्याच्या दहावीच्या मुलीचा सहयोग घेतो. त्यातून निर्माण होणारे विविध समस्या या लघुपटात दाखवण्यात आल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाच्या महत्त्वासोबतच विविध घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लघुपटाला भावनिक टच दिल्याने ती विचार करायला भाग पाडते.

यू-ट्यूबवर दहा हजार व्ह्युवर्स : मार्च२०१४ मध्ये शॉर्ट फिल्म यू- ट्यूबवर अपलोड केली. पहिल्या दिवसापासूनच अनेक व्हिवर्सनी त्याला उत्तमोत्तम कमेंट्स दिल्या. आज या लघुपटाचे व्ह्युवर्स दहा हजारांवर पोहोचले अाहे.
होम मेड साहित्यांचा वापर : चित्रीकरणासाठीट्रॉली, ट्रायपॅड यांसारखे साहित्य सर्व घरी तयार केले. साहित्य खरेदीवर होणारा खर्च या होम मेड साहित्याने वाचवता आला. चित्रीकरण तीन ठिकाणी झाले. त्याचे सेटदेखील कलाकारांनी स्वत: केले.
कलाकारांचा सहभाग : लघुपटाचेलेखन दिनेश गावंडे यांनी केले असून, दिग्दर्शन सुधाकर गीते यांनी केले आहे. दिग्दर्शन, स्क्रिनप्ले, लीड रोलचे काम डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. या लघुपटात जयश्री मिसाळ, श्रिया भिडे, रमेश थोरात यांनी काम काम केले आहे. गणेश बुडूकले यांनी कॅमेरा वर्क आणि एडिटिंगचे काम पाहिले, तर हिंगणा येथे झालेल्या चित्रीकरणात चंद्रमोहन पाटील, गणेश ताथोड, भास्कर ताथोड अादींचे सहकार्य लाभले.