आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाला फुला-पानांचा करण्यात येतो साज; मंदिरामध्ये दर्शनासाठी होते भाविकांची मोठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमनी, सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती, देव दर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत..’ श्रावण हा मासोत्तम व भक्तीचा मास असून, मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईदही उद्या येत असल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
श्रावण महिन्यात घराघरात सोळा सोमवारचे व्रत, श्रावणी सोमवार आणि महादेवाला शिवमूठ वाहणे, उपवास ठेवणे, असे र्शद्धेचे वातावरण दिसून येते. रविवारपासून सुरू झालेल्या श्रावण मासारंभाने शहरातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन होत आहे. पाठोपाठ नागपंचमी, कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, पोळा, मोठी तीज, गौरी-गणपती, हरितालिका उत्सव आदी विविध सण-उत्सवांची रेलचेल आहे. शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी मागील पंधरवड्यापासूनच वाढलेली आहे. मारवाडी समाजाच्या श्रावण मासानिमित्त दर सोमवारी पूजन व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होतच होती, आता त्यात अधिक भर पडणार आहे.
श्रावणानिमित्त मंदिरात दररोज पहाटे शिवलिंगाला अभिषेक, महापूजा, आरती करण्यात येत आहे. दर श्रावण सोमवारी शिवाला फुला-पानांनी सजवण्यात येणार असून, हा साज पाहण्यासाठी दर सोमवारी रात्री भाविकांची मोठी गर्दी होते. दर सोमवारी कावडीने शिवभक्त जलाभिषेक करणार आहेत, चौथ्या श्रावण सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्यासाठी कावड उत्सव येऊ घातला आहे. पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांमध्येही उत्साहाचे व धार्मिक वातावरण दिसून येत आहे. रोजा पाळणे, नियमित नमाज अदा करणे सुरू आहे.