आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड : पोलिसांकडून राजकीय वैमनस्याचे ‘उत्खनन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडाच्या तांत्रिक तपासाला पोलिसांनी सुरुवात केली असून, कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात येत आहेत. 9 सप्टेंबरला पोलिसांनी मलकापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे जबाब नोंदवले. राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या हत्याकांडाला इतरही कंगोरे आहेत काय, याचाही पोलिस शोध घेत आहेत. सिद्धेश्वर देशमुख यांची 23 ऑगस्टला गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी नीलेश काळंके, मोहन उर्फ बल्लू मार्कंड आणि विष्णू डाबके यांची पोलिस कोठडी घेऊन कसून चौकशी केली. गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल आणि चाकू कुंभारीजवळच्या तलावातून जप्त केला.

सिद्धेश्वर देशमुख यांची 23 ऑगस्टला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी खदान पोलिसांनी नीलेश काळंके, मोहन उर्फ बल्लू मार्कंड आणि विष्णू डाबके यांची पोलिस कोठडी घेऊन कसून चौकशी केली. गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल आणि चाकू कुंभारीजवळच्या तलावातून जप्त केला.

शोध राजकीय वैमनस्याच्या प्रारंभाचा.
सरपंच सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड राजकीय वैमनस्य आणि विकासातील ‘मलई’ लाटण्यावरून घडले. मलकापूर ग्रामपंचायतमध्ये 17 सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी अविश्वास ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला होता. एका बाजूला नऊ तर दुसर्‍या बाजूला आठ सदस्य, अशी विभागणी झाली होती. पोलिस ग्रामपंचायत सदस्यांच्या चौकशीतून मध्यंतरी झालेले अविश्वास नाट्य समजून घेत आहेत. या राजकीय वैमनस्याची सुरुवात नेमकी केव्हा आणि कोठून झाली, हेही शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.