आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Siddheshwar Deshmukh Murder Case Third Accused Police Custody

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड : तिसर्‍या आरोपीलाही एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मलकापूरचे सरपंच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्वर देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तिसर्‍या आरोपीस अटक करण्यात खदान पोलिसांना गुरुवार, 29 ऑगस्टला यश आले. 23 ऑगस्टला देशी पिस्तुलाने गोळ्या झाडून सिद्धेश्वर देशमुख यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच दोन आरोपींना अटक केली असून, ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी विष्णू नारायण डापके रा. कुंभारी यास पोलिसांनी मोठय़ा शिताफीने दुपारी मलकापूर परिसरातील औद्योगिक वसाहतीतून ताब्यात घेतले. दरम्यान, विष्णू डापके या आरोपीला प्रथर्मशेणी न्यायदंडाधिकारी के. के. शाह यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारपक्षातर्फे अँड. बी. आर. पंचोली यांनी युक्तिवाद केला.

खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या मलकापूर येथे 23 ऑगस्टला सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांची आरोपी नीलेश काळंके व मोहन उर्फ बल्लू मार्कंड यांनी संगनमताने भरदिवसा देशी पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केली होती. आधी धारदार चाकूने वार करण्यात आले, त्यानंतर देशमुख यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. अतिशय क्रूरतेने त्यांची हत्या आरोपींनी केल्याने मलकापूर व अकोल्यातील राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली होती. या घटनेपासून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे छापासत्र सुरू झाले होते. जिथे आरोपी गेले त्या ठिकाणांची पोलिस कसून तपासणी करत आहे. आरोपी विष्णू डापके हा एका गॅस गोदामवर काम करत होता, तर मोहन उर्फ बल्लू मार्कंड याचा अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय होता. याच माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. आताही विष्णू डापके हा मलकापूर परिसरातील औद्योगिक वसाहतमध्ये एका गॅस गोदामवर काम करत असल्याचे समोर आले आहे.

देशी पिस्तूलची कुंभारी परिसरात पाहणी
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्वर देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींनी कुंभारीतील शेतशिवारामध्ये हत्येत वापरण्यात आलेली देशी पिस्तूल एका तलावात फेकून दिली होती. याच परिसरात पोलिसांनी बारकाईने पाहणी केल्याची माहिती आहे.

आरोपींच्या घराची झाडाझडती
सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी विष्णू नारायण डापके याला अटक करण्यात आली. यानंतर खदान पोलिसांनी कुंभारी येथे जाऊन आरोपीच्या घराची कसून झाडाझडती घेतली तसेच औद्योगिक वसाहतीची आरोपीला सोबत घेऊन पाहणी केली.

आरोपींनी डापकेकडे दिली पिस्तूल
सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर गुन्ह्यात वापरण्यात आलेली देशी पिस्तूल आरोपी नीलेश काळंके, मोहन उर्फ बल्लू मार्कंड यांनी विष्णू डापकेकडे दिली होती. त्यानेच ही पिस्तूल एका तलावात फेकून दिल्याचे समोर आले तसेच गुन्ह्यात वापरलेली एम.एच. 30- यू - 2168 क्रमाकांची दुचाकी खदान पोलिसांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केली.