आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड: गुन्ह्याचे एमपी ‘कनेक्शन’ उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडाचे मध्य प्रदेश ‘कनेक्शन’ 1 सप्टेंबर रोजी न्यायालयात उघड झाले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आरोपींनी मध्य प्रदेशातील खकनार येथून एका गुन्हेगाराकडून खरेदी केल्याचे पोलिसांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता आरोपींची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी खदानचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी केली. अखेर न्यायालयाने नीलेश काळंके आणि मोहन उर्फ बल्लू मार्कंड यांची 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

देशमुख हत्याकांडातील आरोपी मार्कंड, कंकाळे आणि विष्णू डाबके यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना 1 सप्टेंबर रोजी प्रथम र्शेणी न्यायदंडाधिकारी प्र. ह. नेरकर यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने डाबकेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. डाबकेकडून अँड. शंकर ढोले आणि अँड. अभय उतखडे यांनी युक्तिवाद केला.

दृष्टिक्षेप न्यायालयातील युक्तिवादावर
खदानचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी न्यायालयात घटनाक्रम विशद केला. आरोपींनी पिस्तूल खरेदी केलेल्या मध्य प्रदेशातील इसमाला ताब्यात घेणे आवश्यक आहे. या इसमाला आरोपी चेहर्‍यानेच ओळखतात. त्यामुळे तपासामध्ये आरोपीसोबत असणे गरजेचे आहे. आरोपी डाबकेजवळ मार्कंड आणि काळंबे यांनी गुन्ह्यातील पिस्तूल आणि चाकू दिला होता. डाबकेने हा कबुलीजबाब शासकीय पंचांसमोर दिला आहे. तसेच फरार आरोपी अविनाश वानखडेचा ठावठिकाणाबाबत आरोपींची चौकशी करणे गरजेचे आहे, असेही ठाणेदार सपकाळ म्हणाले. सरकारी वकील पंकज महाजन यांनीही आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

आरोपी संपर्कात नाहीत
मार्कंड आणि काळंके हे पोलिस कोठडीत असल्याने ते सूत्रधार वानखडेच्या संपर्कात असण्याचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वकील रवींद्र कोकाटे यांनी केला. तसेच या दोन आरोपींकडून शस्त्र जप्त झालेले नाही. डाबकेने सांगितलेल्या तलावातून शस्त्र जप्त करण्यात आल्याने त्याचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग असू शकतो, असेही अँड. कोकाटे म्हणाले.