आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेताना हवालदार साहेबराव कुटे पोलीसांच्‍या जाळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-पोलिस कारवाई टाळण्यासाठी बार मालकामार्फत लाच स्वीकारणार्‍या जुने शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदारास सापळा रचून सिंधी कॅम्प येथील पूजा वाइन बारमध्ये रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता ही कारवाई केली.

बाळापूर येथील कृषी अधिकारी कार्यालयात शिपाईपदी कार्यरत असलेल्या देवेंद्र र्शीधरराव पातुर्डे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने जुने शहर पोलिसांत तक्रार दिली होती. ‘या तक्रारीवरून कारवाई टाळायची असेल, तर चार हजार रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी पोलिस हवालदार साहेबराव कुटे यांनी देवेंद्र पातुर्डे यांच्याकडे केली होती. मात्र, ‘एवढी रक्कम देऊ शकत नाही’, असे सांगितल्यावर त्यात तडजोड झाली आणि सुरुवातीला 1500 रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर देवेंद्र पातुर्डे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एका वाइन बारमध्ये हा व्यवहार करण्याचे ठरले. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक उर्वरित.यात किशोर बळी यांचे कविसंमेलन, झेप युथ फाउंडेशनचे प्रा. प्रदीप अवचार व नंदकिशोर डंबाळे यांचा सर्जा राजा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम यांचा समावेश आहे.याठिकाणी स्वाक्षरी मोहीमदेखील राबवण्यात येत आहे. नागरिकसुद्धा त्यांच्या समस्या, सूचना, विचार येथे मांडू शकतात. तसेच हे आंदोलन जनसामान्यांचे असून, शहराच्या विकासासाठी नागरिकांना यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी अँड. नितीन धूत, डॉ. चंद्रकांत पनपालिया, संजय कमल अशोक, डॉ. संजय देशमुख, रमेश थोरात, सुधाकर गीते, सचिन थेर, अमोल इंगळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.