आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 84 गावांना बसला गारपिटीचा फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-गुरुवारी रात्री जिल्हय़ात वादळी वार्‍यासह सर्वत्र पाऊस झाला. या वेळी झालेल्या गारपिटीने अकोला, बार्शिटाकळी, अकोट व मूर्तिजापूर तालुक्यात 5600 हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, जिल्हय़ातील 84 गावांना गारपिटीचा फटका बसला, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षाने दिली. या गारपिटीने प्राणी, पक्षी मृत्युमुखी पडले असून, बर्‍याच ठिकाणी नागरिकांना किरकोळ इजा झाली आहे.
4 मार्चपासून राज्यात वादळी वार्‍यासह पाऊस पडत आहे. यामध्ये जिल्हय़ात अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. रात्री 8 ते पहाटे 4 वाजेदरम्यान या भागात पाऊस पडला. गारपीट मोठय़ा प्रमाणात झाली. प्रामुख्याने बार्शिटाकळी तालुक्यात पावसाने थैमान घातलेले दिसून आले. पशुपक्षी, पिके, घरांची पडझड मोठय़ा प्रमाणात झाली. मध्यरात्री वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे अकोला तालुक्यातील अनेक गावांमधील पिकांची हानी झाली असून, पावसामुळे वीटभट्टी मालकांचे तसेच शेतातील गहू, हरभरा, आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसाने झालेल्या नुकसानीचा सव्र्हे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आवश्यक ती मदत पोहोचवण्याची सुविधाही द्याव्या, अशी सूचना महसूल अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
तहसीलदारांकडून पाहणी
तहसीलदार दिनेश गिते यांनी आज सकाळी तालुक्यातील पैलपाडा येथील शिवारात गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. नुकसानीचा आढावा घेऊन महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.