आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small Scale Industry,Latest News In Divya Marathi

लघुउद्योगातून साधा सामाजिक विकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- समाजाचाविकास साधण्यासाठी प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक असते. एखाद्या मोठ्या घटकाचा विकास करताना ब-याच वेळा समाजातील लहान घटकांचा विसर पडतो. आजही मोलकरीण संघातील अनेक महिलांना आपली प्रगती कशी होणार, याची माहिती नाही. रोज काम करून विकास होतो ही संकल्पना महिलांनी बदलली पाहिजे. रोजच्या कामाला जोडधंद्याची साथ हवी. लघुउद्योगाच्या माध्यमातून महिलांनी विकास साधावा, असे प्रतिपादन डॉ. एम. आर. इंगळे यांनी व्यक्त केले. जिजाऊ सभागृह येथे २२ सप्टेंबर रोजी श्रमिक महिलांसाठी उद्योजकता विकास शिबिरात ते बोलत होते.
श्रमिक महिला मोलकरीण संघ लोकहित बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. डॉ. एम. आर. इंगळे यांनी श्रमिक महिलांसाठी लघुउद्योगाच्या फायद्याविषयी मार्गदर्शन केले. घरी उदबत्ती, मेणबत्ती, लोणचे, पापड तयार करणे छोटे काम वाटत असले, तरी यातून मोठा आर्थिक फायदा होतो. सुरुवातीला अडचणींना तोंड द्यावे लागते. पण, सर्व महिलांनी एकत्रित येऊन, नियमित प्रयत्न केले, तर प्रगती साधता येते. महिलांना अनेक हक्क आणि अधिकार देण्यात आले आहे. महिलांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या योजना यांची माहिती प्रत्येक महिलेला असली पाहिजे. त्यासाठी सामाजिक संस्थांसोबतच शासनानेसुद्धा जनजागृतीचे काम करावे. लघुउद्योग म्हणजे कमी भांडवलात मोठा आर्थिक फायदा असतो, असे त्यांनी सांगितले. महिलांनी कामाचे स्वरूप पाहता आर्थिक प्रगती कशी साधता येईल याचा विचार करावा, असे मत पंचशील गजघाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी श्रमिक महिला मोलकरीण संघाची कल्पना, त्याचे कार्य याबाबत त्यांनी माहिती दिली. मोलकरीणसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. पण, प्रत्येक योजनेचा लाभ मिळतोच असे नाही. अनेक महिलांना योजनेची माहितीच नसते. अशा वेळी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहितीच नाही, तर त्याचा लाभ मिळेपर्यंत प्रयत्न केले जातात, असे ते म्हणाले. साबिर मौलाना यांनी प्रास्ताविकात लघुउद्योग प्रशिक्षणामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण तायडे, तर आभार प्रदर्शन शैलेश सूर्यवंशी यांनी केले. या वेळी श्रमिक महिला मोलकरीण संघाच्या अध्यक्षा कल्पना सूर्यवंशी, प्रशांत मेश्राम, दिनकर निकम, अनिल शेंडे आदी उपस्थित होत्या. जिजाऊ सभागृहात आयोजीत श्रमिक महिलांसाठी उद्योजकता विकास शिबिरात उपस्थित महिला.