आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारुडी समाज लढतोय समस्यांशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- साप आणि मुंगसाच्या लढाईसोबतच हातचलाखीचे अनेक प्रयोग दाखवणारा कजबी कलाकार असलेले गारुडी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने 2002 पासून आणलेल्या कायद्यानंतर डमरूच्या तालावर सापाचे खेळ करणार्‍या गारुडींचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला असला तरी, अद्यापही नागपंचमीच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागात गारुडींची वाट पाहिल्या जाते. सरकारच्या कायद्यामुळे गारुडी जमातीच्या पोटावर पाय पडला असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या 11 वर्षांपासून कायम आहे.

गारुडी समाजाचे अकोल्यात आता बोटावर मोजण्याइतकेच घरे शिल्लक आहेत. आजही त्यांना आपल्या हातसफाईचे कौतुक आहे. मात्र, मुळातच भटकी जमात असलेल्या या गारुडीने आपली ओळख समोर आणण्यास नकार देत शासनाविषयी रोष व्यक्त केला. गारुडीपणा संपला तसा या जमातीच्या काही लोकांनी मजुरी, तर काहींनी भिक्षा मागणो सुरू केले. आपली ओळख देण्यास अनुत्सुक असलेल्या या जमातीचे साप म्हणजे दैवत होते. आज अनेक साप हाताळणारे वृद्ध जरी येथे नसले तरी, कधीकाळी आपण त्यांच्या जवळून ही कला अवगत केल्याचा रास्त अभिमान त्यांना आहे. जमातीतील प्रत्येक घरात साप असायचे, तर कधी गावात साप निघाला की, जमातीतील लोकांना सन्मान मिळायचा. पावसाळ्यात निघालेले साप पकडून काही दिवस ठेवल्यानंतर त्याचे खेळ सुरू करायचे, हा पिढीजात धंदा असला तरी, आपल्या उस्तादाचा उल्लेख अतिशय आदरपूर्वक करणारा हा समाज आपल्या राहणीमानाविषयी दुर्लक्ष करतो. सरकारने आपल्या कामावरील बंदी उठवली तर आपण त्याच व्यवसायाला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. कधी स्थिर नसलेल्या वास्तव्यामुळे समाजात शिक्षणाने प्रवेश केलाच नाही. आताही त्यांच्या पाट्या कोर्‍याच आहेत. वडीलमंडळी कामाच्या शोधात फिरतात, यांची मुलेदेखील भिक्षा मागत असतात.

वन व पशुहिंसा कायद्याने त्यांच्याकडील साप सरकारने काढून घेतले. मात्र, हाती कोणत्याही नव्या प्रकाशरेषा न देता केवळ काळोखात आणि अपरिचित अवस्थेत आपले जीवन शोधण्याच्या प्रयत्नात अद्यापही हा समाज लागला आहे.

सापाच्या ज्ञानासाठी झाला असता गारुडींचा वापर
या समाजापर्यंत शासनाची कुठलीही योजना पोहोचली नाही. या समाजाने कधीही आपल्या समस्या मांडल्या नाहीत. याचा उपयोग खरेतर सापाचे ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी करायला हवा होता. मात्र, शासनाकडून तसे झाले नाही, अशी खंतही समाजातील एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


कायद्याचा उपयोग काय झाला?
2002 सालापासून लागू करण्यात आलेल्या कायद्याने सर्पमित्रांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी छापे घातले. यादरम्यान शंभर ते सव्वाशे सापांना गारुडींच्या तावडीतून सोडवले असले तरी, सापांविषयीची जागरूकता पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. आजही 90 टक्के साप अज्ञानापोटी मारल्या जातात. गारुडींकडील साप कायद्याने काढून घेतले तरी, त्या कायद्याने सर्व हत्या करणार्‍यांवर काय कारवाई केली.

समाजातील वृद्धांना आहे आशा
वृद्धांना या व्यवसायाकडे वळू, अशी आशा आहे. सापाला क्रूरतेने हाताळतात म्हणून उपजीविकेपासून वंचित ठेवणार्‍या निसर्गप्रेमींनी काय केले, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.