आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओक सभागृह परिसरात आढळला मांडूळ साप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पर्यावरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणा-या शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणा-या सापांच्या अनेक प्रजाती शिकार तस्करीमुळे नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकीच एक असलेला मांडूळ हा दुर्मिळ साप आज २२ सप्टेंबरला शहरातील मध्यवस्तीतील प्रमिलाताई ओक सभागृह परिसरात दुपारच्या सुमारास आढळून आला. सर्पमित्र बाळ काळणेंनी त्याला पकडून वन विभागाच्या सुपूर्द केले, सोबतच तस्करीचा संशय व्यक्त केला.
मांडूळ हा साप दुर्मिळ असून, काळ्या तपकरी रंगात आढळणारा हा साप मऊ भुसभुशीत काळ्या मातीत राहणे पसंत करतो. हा साप १.२५ मीटरपर्यंत लांब वाढतो. तोंडाकडील शेपटीकडील भाग सारखाच असल्याने हा दुतोंड्या म्हणून ओळखल्या जातो. या सापाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. हा साप गुप्तधनाच्या शोधासाठी उपयोगी पडतो. तांत्रिक या सापाच्या मदतीने पैशांचा पाऊस पाडू शकतात. या सापाला जवळ बाळगल्यास धनसंपत्तीत वाढ होते. काही जण याचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. कारण साडेतीन किलोपेक्षा अधिक किलोच्या सापाला लाखो रुपये किंमत मिळते.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास प्रमिलाताई ओक सभागृह परिसरात हा साप आढळून आला. त्याला पाहून भयभीत झालेल्या तेथील वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी किंग कोब्रा अँड अ‍ॅडव्हेंचर क्लबच्या सर्पमित्र बाळ काळणेंना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतले. हा साप चांगलाच मोठा साडेतीन फूट लांब असल्याचे त्यांनी सांगितले. एवढा मोठ्या आकारातील दुर्मिळ मांडूळ शहरातील अत्यंत वर्दळीच्या ओक सभागृहात आढळणे म्हणजे तस्करीचा संशय असल्याचे ते म्हणाले.
तर तेथील एका युवकाने गत तीन-चार दिवसांपासून या सापाचे या परिसरात दर्शन घडत असल्याचे सांगितले. सर्पमित्र बाळ काळणे यांनी त्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या स्वाधीन केले. सापांची तस्करी होते असल्याचा संशय व्यक्त केला आहे.