अकोला- सामाजिक वनीकरण विभागाच्या अमरावती वृत्तातील लागवड अधिकारी, सहायक लागवड अधिकारी यांचे दोन दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषक भवनात झाले. प्रशिक्षणात औषधी वनस्पती, रोपवाटिका तंत्रज्ञान व्यवस्थापन, जल मृद संधारण, व्यक्तिमत्त्व विकास आदींचे धडे अधिका-यांनी गिरवले.
कृषक भवनात सामाजिक वनीकरण विभाग अकोलाचे उपसंचालक सुनील जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाचे उद््घाटन झाले. उद््घाटक म्हणून सामािजक वनीकरण अमरावती वृत्ताचे उपमहासंचालक डॉ. आर. एन. राय होते. या वेळी उपस्थितांची समयोिचत भाषणे झाली. दुपारच्या सत्रात सहसंचालक व्ही. व्ही. घाटे यांनी सामािजक वनीकरणाची ध्येय धोरणांवर प्रकाश टाकला. त्यानंतर कृषी विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यानातील व्यापारी फळ रोपवाटिकेचे डॉ. सरोदे यांनी अौषधी वनस्पतींविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ. उज्ज्वल राऊत यांनी ‘रोपवाटिका तंत्रज्ञान व्यवस्थापन’ विषयावर प्रकाश टाकला. भोजन अवकाशानंतर डॉ. एस. एम. ताले यांनी जल मृद संधारण विषयावर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मेहरबानू महािवद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सिंगरूप यांनी सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास नियोजन या विषयावर प्रकाश टाकला. २० नोव्हेंबरला सकाळच्या पहिल्या सत्रात सामािजक वनीकरणचे उपसंचालक बी. टी. फरताडे यांनी सकारात्मक दृष्टिकोन विषयावर तसेच उपवनसंरक्षक विवरेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशिक्षणात सहभागी अधिकाऱ्यांनी
आपल्या अनुभवांचे, विचारांचे आदानप्रदान केले. त्यानंतर प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. प्रशिक्षणात अकोल्यासह यवतमाळ, वाशीम, बुलडाणा, अमरावतीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. प्रशिक्षणाचे संचालन गोविंद पांडे यांनी केले. सचिन काणे, मुख्य लेखापाल एम. एस. शिवलकर, जयश्री पाली, प्रिया तसरे, पंकज पारधी यांचे सहकार्य लाभले.