आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Welfare Department News In Marathi, Divya Marathi

समाजकल्याण विभागात शिपाईच बनले अधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील निरीक्षक गायब असल्यामुळे गुरुवारी, 29 मे रोजी पत्रकारांना पाहून चक्क शिपाईच या अधिकार्‍यांच्या खुर्चीवर जाऊन बसले.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा प्रभार विशेष समाजकल्याण अधिकारी एस. एम. चव्हाण यांच्याकडे आहे. मात्र, ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील समाजकल्याण अधिकारी कार्यालयात बसत असल्याचा फायदा कर्मचारी घेताना दिसत आहेत. समाजकल्याण विभागाला ‘अधिकारी’च नसल्याने निरीक्षकांसह कर्मचार्‍यांचे चांगलेच फावत आहे. समाजकल्याण विभागातील निरीक्षक गुरुवारी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत आढळून आले नाहीत. त्यांच्या विभागातील कपाट बंद, तर खुच्र्या रिकाम्या आढळून आल्या. प्रभारी समाजकल्याण अधिकार्‍यांची अनुपस्थिती पाहून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील निरीक्षक कार्यालयाला दांड्या मारत आहेत.

समाजकल्याण सभापतींचा वरदहस्त
जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभाग या ना त्या प्रकरणाने नेहमी चर्चेत राहत आहे. अलीकडेच या कार्यालयातील अधीक्षक चंद्रशेखर वंजारी व समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक डी. एम. पुंड यांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. समाजकल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणारे टिनपत्रांचे प्रकरणसुद्धा चांगलेच गाजत आहे. यामध्ये तर समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांकडून पुरवठय़ाआधीच पोचपावती घेतली आहे. याही प्रकरणाची चौकशी सुरू आहे. समाजकल्याण विभागातील विविध योजना खोळंबल्या आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव यांच्याकडून एकाही प्रकरणाची साधी विचारपूससुद्धा संबंधितांकडून करण्यात आली नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर त्यांचा वरदहस्त असल्याचे दिसून येते.