आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभावशाली कार्यक्रमांवर भर द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - समाजात कार्य करताना सर्व बाजूने विचार करून कोणत्या घटकांना आपण मदत करू शकतो, याबाबत संघटनेने प्रयत्नशील असले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला मदत केली म्हणजे आपले कार्य संपले असे नाही, तर प्रभावशाली कार्यक्रम नेहमीसाठी कसे राबवता येतील, यावर भर दिला पाहिजे, असे मत जेसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक नहार यांनी व्यक्त केले. 23 मे रोजी हॉटेल सिटी प्राइड येथे आयोजित जेसीआय अकोला विभागीय परिवार झोन 13 च्या संमेलनात ते बोलत होते. जेसीआय अकोला न्यू प्रियदर्शनीतर्फे संमेलन घेण्यात आले.
संघटनेसोबत काम करताना काय काळजी घ्यावी, आपले व्यक्तिमत्त्व कसे असावे, याबाबत मार्गदर्शन करताना नहार म्हणाले, कोणत्याही संघटनेसोबत काम करताना नकळतच आपला विकास होत असतो. तसेच, कोणतेही कार्य करताना त्याचा दीर्घकाळासाठी कसा फायदा होईल, याचा विचार के ला पाहिजे. एखाद्या मुलाला शिष्यवृत्ती देऊन आपण त्याचा आर्थिक प्रश्न सोडवू शकतो. पण, आपण त्याला दत्तक घेतले आणि त्याच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली तर त्यामुळे तो त्याच्या पायावर उभा राहू शकतो. दरवर्षी अशा एखाद्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्धार आपण केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. जेसीआय अकोलातर्फे एका अपंग मुलाला व्हील चेअर देण्यात आली तसेच जवळपास 25 गरजू व्यक्तींना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिल्पा चांडक यांनी जेसी आस्थाचे वाचन केले. अकोट, खामगाव, बुलडाणा येथील जेसीआयच्या अध्यक्षांनी अहवाल सादर केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी झोन डायरेक्टर सीए मनोज चांडक हे होते. न्यू प्रियदर्शनीच्या अध्यक्षा वंदना हेडा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल भट्टड यांनी, तर आभार प्रदर्शन शशांक कपले यांनी केले. या वेळी विभागीय अध्यक्ष भरत शर्मा, विभागीय उपाध्यक्ष अँड. महेंद्र चांडक, पंकज शर्मा, डॉ. सुनील लुल्ला, राजकुमार भगत, प्रमोद वाघमारे, कल्पना मुंदडा, स्नेहल अभ्यंकर, नितीन झाडे, कविता मालू, संदेश रांदड, डॉ. विजय टावरी, प्रा. ज्योती माहेश्वरी, कृष्णा तापडिया, कविता ढोरे, सुशीला कोठारी यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.