आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या देशहितासाठी अद्वेषतेची नितांत गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- समाजात वेगवेगळे वर्ग असतात. समाजात एक वर्ग द्वेष करणार्‍यांचा द्वेष करतो. एक वर्ग द्वेष न करणार्‍यांचाही द्वेष करतो, तर संत द्वेष करणार्‍यांवरही प्रेम करतात. आज आपल्या देशहितासाठी अद्वेषतेची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन संजय महाराज पाचपोर यांनी 10 जून रोजी केले.
आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र काटेलधाम ते र्शीक्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडी पालखी सोहळा आज दुपारच्या मुक्कामासाठी वृंदावननगरातील प्रा. बाळासाहेब बदरखे यांच्या निवासस्थानी पोहोचला. त्या वेळी झालेल्या प्रवचनात महाराज हितोपदेश करत होते. पालखी सोहळ्याचे यंदा पहिले वर्ष असून, संत गुलाबबाबा संस्थान काटेल येथून र्शींची पालखी 6 जूनला निघाली. या पालखीचे सोमवार, 9 जूनला अकोल्यात आगमन झाले असून, 9 व 10 जूनला पालखीचा शहरात मुक्काम आहे. पालखी 10 जूनला सकाळी 7 ला पारसकर शोरूमसमोरून रामलता चौक, प्रभात किड्समार्गे जवाहरनगर चौकातून वृंदावननगर, टेलिफोन कॉलनी येथे प्रा. बाळासाहेब बदरखे यांच्या निवासस्थानी पोहोचली.
या ठिकाणी संजय महाराज पाचपोर यांचे प्रवचन झाले. प्रवचनास परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यानंतर आरती करून प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर वारकर्‍यांसह परिसरातील नागरिकांनी जेवण घेतले. तेथील विर्शांतीनंतर बारा ज्योतिर्लिंग मंदिर, जठारपेठ टॉवररोड, रतनलाल प्लॉट चौकातून बसस्थानक, गांधीरोड, शहर कोतवाली, जयहिंद चौक, राजेश्वर मंदिर, पोळा चौक, डाबकीरोडमार्गे मेथकर संकुल येथे आज रात्रीच्या मुक्कामास पोहोचली. 11 जूनला सकाळी मेथकर संकुलातून हरिहरपेठमार्गे लाखनवाडाकडे प्रस्थान होईल. पालखीसोबत मार्गदर्शक म्हणून संजय महाराज पाचपोर, दिंडी प्रवर्तक ज्ञानेश्वर महाराज इंगळे, दिंडीप्रमुख म्हणून व्यंकटराव पाटील हिरे, व्यवस्थापक वासुदेव महाराज राऊत, नथ्थू पाटील कड, अनिल डांगे आहेत.