आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर - नागपूर विशेष गाडी आता अकोलामार्गे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिलपासून अकोला, वाशीम मार्गे सोलापूर-नागपूर ही विशेष रेल्वेगाडी एप्रिलपासून सुरू झाली आहे. येत्या २४ जूनपर्यंत सेवेत असणार आहे. या गाडीमुळे विदर्भातील भाविकांना पंढरपूर, अकोलकोट या ठिकाणी दर्शनाला जाणे सोपे झाले आहे.

दर बुधवारी ही विशेष गाडी (क्रमांक ०१४०१) सोलापूर येथील दुपारी ३.२० वाजता निघेल. रस्त्यात तिला अनेक थांबे दिलेले आहेत. उस्मानाबादला सायंकाळी सव्वासहाला पोहोचेल.
लातूरला रात्री ७.५०ला तर परळीला १०.४० पोचेले. त्यानंतर पुढे रवाना होईल. परभणीला पहाटे एकला, हिंगोलीला पहाटे चारला, वाशीमला पहाटे ४.५०ला, अकोल्याला ६.१० वाजता पोहोचला आणि नागपूरला दुपारी १२.२५ ला पोचेल. परतीची गाडी (क्रमांक ०१४०२) दर गुरुवारी नागपूरवरून दुपारी तीनला निघेल.

ती दुसऱ्या दिवशी सोलापूरला सकाळी ११.३५ला पोचेल. गाडीस एकूण १२ डबे असणार आहेत. यात एक वातानुकूिलत टू टायर, दोन वातानुकूलित थ्री टायर, चार शयन, तीन साधारण आदी डबे असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे.