आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेचा वसा जपणारा शहरातील युवा अभियंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सौरऊर्जा ही अक्षय ऊर्जा असून, तिचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनही जोरकस प्रयत्न करते. मात्र, सौरऊर्जेवरील यंत्रणा ही महागडी असल्याने अनेक जण त्याकडे वळत नाहीत. मात्र, जुने शहरातील युवा अभियंता श्रीवल्लभ पुसेगावकर याने आपला छंद जोपासत त्याला उद्याेगाचे स्वरूप दिले असून, त्यातूनच रोजगार निर्मिती केली आहे.
वाढत्या विकासाबरोबर ऊर्जेची गरजही वाढती आहे. त्यामुळेच संपूर्ण जगभरात ऊर्जेचे नवनवीन स्रोत शोधण्यावर भर देण्यात येत असल्याचे दिसते. पारंपरिक पद्धतीने वजिेची नरि्मिती ही प्रामुख्याने जलवदि्युत व औष्णिक प्रकल्पांमधून होते. मात्र, दविसेंदविस वाढत जाणारे पाण्याचे दुरि्भक्ष व कोळशाचे मर्यादित साठे तसेच औष्णिक प्रकल्पांमधून होणारे प्रदूषण आदींमुळे वीजनरि्मितीसाठी नवीन विकल्प शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. अणुऊर्जेसारख्या पर्यायांमध्ये गुंतणारे परकीय चलन पाहता आपल्या देशात आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित स्रोतांचा वापर करण्यावर भर देणे गरजेचे आहे. अपारंपरिक ऊर्जा साधनांचा विचार करता सौर व पवन हे दोन मुख्य पर्याय आहेत. त्यापैकी भौगोलिक परिस्थितीनुसार विदर्भात सौरऊर्जा हा पर्याय उजवा ठरतो. ३६५ दविसांपैकी ३४० दविस स्वच्छ सूर्यप्रकाश ही जमेची बाजू आहे. त्यातून नरि्माण होणारी वीज प्रदूषणरहित व पर्यावरणपूरक आहे. याच बाबींचा विचार करून श्रीवल्लभ त्याकडे आकृष्ट झाला. मात्र, असे करताना बाजारात यापूर्वीच असलेल्या विकल्पांपेक्षा स्वस्त विकल्प देण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. म्हणून त्याने लाइट एमेटिंग डायोड (एलईडी) हा प्रकाशस्रोत नविडला. महाविद्यालयीन जीवनात भौतिकशास्त्रात अधिक रुची होती. त्यामुळे पुन्हा एकदा खोलात जाऊन अभ्यासाला लागून एका छोट्या घरात दिवे व पंखे चालतील, अशी यंत्रणा बनवली. त्याचे वर्षभर प्रयोग केले, चाचणी घेतली. त्यानंतर त्याविषयी प्रचार-प्रसार केला. सुरुवातीला अनेकांनी प्रणाली पाहलिी व कौतुक केले. मात्र, पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसताना प्रणाली कशी कार्य करेल? याविषयी शंका व्यक्त केली. विदर्भात पावसाळ्यात मिळणारा सूर्यप्रकाश बॅटरी चार्ज करण्यास पुरेसा असल्याचे लक्षात आल्यानंतर ती शंका दूर झाली. आज सौरऊर्जा उपकरणांची मागणी वाढली आहे. अशा रीतीने आर्य टेक्नाॅलॉजी प्रतिष्ठान अस्तित्वात आले. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित मेळघाटातील हतरू येथील आदविासी आश्रमशाळेत सौरऊर्जेवरील प्रकाशदिवे लावण्याचा क्षण मी आजही विसरत नसल्याचे श्रीवल्लभ सांगतो. विदर्भातील अनेक शहरांमध्ये आज, त्याच्या सौरऊर्जा प्रणालीवर संगणकापासून कूलरपर्यंत सर्व यंत्रणा चालतात.