आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमचा क्रमांक घेऊन ७४ हजारांनी गंडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड- येथील नागरिकाला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून एटीएमचा क्रमांक विचारून ७४ हजार रुपयाने गंडवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक चंडिका चौकातील रहिवासी भगवान श्यामराव ढबाले यांना २२ जून रोजी सकाळच्या दरम्यान एक भामट्याने मी बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलतो, तुमचे एटीएम कार्ड बंद असून, ते सुरू करावयाचे आहे. तरी तुम्ही एटीएम कार्डच्या समाेरील बाजूचा १६ अंकी क्रमांक सांगा कार्डच्या मागील क्रमांक सांगा, असे सांगितले.
ढबाले यांनी क्रमांक दिला. त्या क्रमांकावरून भामट्याने ७३ हजार ४८८ रुपयांची परस्पर खरेदी केली. ते पैसे ढबाले यांच्या खात्यातून वजा झाले. त्यांचा मित्र डिगांबर ढगे यांच्या लक्षात आल्याने भगवान ढबाले यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४२०, ४१७ कलमान्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार भास्कर तंवर, पोलिस हेडकॉन्स्टेबल यादव करत आहेत.
निनावीफोन आल्यास राहा सावधान: निनावीफोन करून एटीएम क्रमांकाची माहिती विचारून खात्यावरील पैसे काढले जात आहेत. बँकेचा अधिकारी बोलत असून, तुमच्या एटीएमचा पीन क्रमांक विचारून फसवणूक केली जात आहे. तुमच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचा फोन आला तर त्याला खाते क्रमांक, एटीएम क्रमांक याची कोणतीच माहिती देऊ नये. जर असा फोन आलाच तर बँकेत जाऊन खातरजमा करावी. फोन कोणी केला, त्याचे नाव काय, याची विचारपूस करावी. परंतु, आपली माहिती त्याला देऊ नये.
एक भामट्याने तुम्ही एटीएम कार्डच्या समाेरील बाजूचा १६ अंकी क्रमांक सांगा कार्डच्या मागील क्रमांक सांगा, असे सांगितले. त्यांनी त्याला माहिती पुरवली.
नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवर
लॉटरीलागल्याचा मेल पाठवून, जमिनीवर टॉवर मंजूर झाल्याचे सांगत तसेच एटीएम कार्डचा क्रमांक विचारून फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात घडत आहेत. परंतु, या गुन्ह्यांची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. फोन भारतातून आला तरी, क्रेडिट एटीएम कार्डवर खरेदी जगातल्या कोणत्या तरी देशात झालेली असते. नायजेरियन फ्रॉडचीही तशीच पद्धत आहे. या गुन्ह्यांचा तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना मर्यादा आहेत. किंबहुना सायबर क्राइमचा एखाद-दुसराच गुन्हा आतापर्यंत पोलिसांना उघडकीस आणता आलेला आहे. परंतु, हे सर्व गुन्हे वैयक्तिक स्तरावरचे होते.
बातम्या आणखी आहेत...