आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Somnath Shetye New Commissioner Of Akola Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमनाथ शेट्ये नवे मनपा आयुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेला१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आयुक्त मिळाले आहे. वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेट्ये यांची अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौ-याच्या वेळी अकोलेकरांना एक चांगली भेट दिली आहे.
वर्धा नगरपालिकेत काही महिन्यांपूर्वीच ते रुजू झाले होते. स्वच्छता अभियान आणि प्लास्टिक निर्मूलन मोहीम त्यांनी यशस्वीरीत्या राबवली. त्यामुळे ते चर्चेत आले. प्रशासनावरील पक्की पकड ही त्यांची काम करण्याची शैली आहे. वर्धा नगरपालिकेतील कार्यकाळात त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केल्याने त्यांची कारकीर्द वादमुक्त राहिली. सोमनाथ शेट्ये यांच्या नियुक्तीमुळे आयुक्त कोण? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मनपा क्षेत्रात १५ कोटींची कामे सुरू झाली आहेत, तर अनेक कामे प्रस्तावित आहेत. आयुक्त मिळाल्याने कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.