आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Source Of Economic Organization Of Local Self government

व्यापारी संकुलाचे 25 वर्षांपासून भाडे केवळ अडीच हजार रुपयेच, जिल्हा परिषद मात्र झोपेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हापरिषदेने १९८९ मध्ये २० व्यापारी संकुलांचे बांधकाम केले होते. या संकुलातील २० दुकाने भाड्याने देतानाजिल्हा परिषद प्रशासनाने काेणताही करारनामा केला नाहीच,श्‍िवाय त्यांच्या भाड्यातही वाढ केली नाही. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिक स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना अकाेला जिल्हा परिषद मात्र झाेपेत अाहे.
बाबासाहेब धाबेकर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा महसूल वाढावा म्हणून िसव्हिल लाइन भागात १९८८ - १९८९ या वर्षात २० व्यापारी संकुलांचे बांधकाम केले होते. यापैकी काही दुकाने सुरुवातीला, तर काही दुकाने कालांतराने भाडेतत्त्वावर देण्यात आली. मात्र, दुकाने भाडे तत्त्वावर देताना जिल्हा परिषद प्रशासनाला दुकानदारासाेबत करारनामा करण्याचा विसर पडला. या दुकानांची देखरेख िनगराणीचे काम बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे असताना त्यांनी कर्तव्यात िदरंगाई करत भाडे वसुलीबाबत िनष्क्रियता दर्शवल्याने अनेकांचे भाडे प्रलंबित राहिले, असा शेरा सीनिअर ऑडिट ऑफिसर एल. बी. यांनी िदला आहे.

फक्तअडीच हजार रुपये भाडे
दुकानदारांना१९८९ पासून महिन्याला अडीच हजार भाडे आकारण्यात येते. या भाड्यात एक रुपयानेही वाढ करण्यात अालेली नाही. जिल्हा परिषदेच्या िवद्यमान भारिप-बहुजन महासंघाच्या सदस्यांनी या प्रकाराची दखल घेत बांधकाम िवभागाला थकित भाडे वसुलीचे आदेश दिले. त्यामुळे काही प्रमाणात वसुली झाली आहे.

पाठपुरावा करू
थकितभाडे वसुलीबाबत आधीच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. आता वसुली, करारनामा करून घेण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी दुकानदारांनी सहकार्य करावे.'' शोभाताईशेळके, सदस्य,जिल्हा परिषद