आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत चोरट्यांची "सॉसी गँग' सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हरियाणा राज्यात चोऱ्यांसाठी कुख्यात असलेल्या 'सॉसी गँग'ने आपला पाय राज्यात रोवला आहे. रेल्वेमध्ये चोऱ्या करण्याचा सपाटा या गँगने लावला आहे. या चोरांच्या टोळीपासून सावध राहण्यासाठी रेल्वेने रेल्वेस्थानकावर तसेच रेल्वेमध्ये पोस्टर्स लावले आहे.
"सॉसी गँग' ही शिताफीने चोरी करणारी गँग आहे. या टोळीमध्ये ते तरुण मुलांचा सहभाग आहे. टोळीतील काही सदस्य हे सामान्य तिकीट काढून रेल्वेतून प्रवास करतो आहे, असे भासवतात तसेच एसी आणि स्लीपर डब्यातूनही ते प्रवास करतात. यातील काही सदस्य डब्याच्या दाराजवळ उभे राहून डब्यातील प्रवाशांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतात, तर टोळीतील काही सदस्य प्रवाशाच्या सामानाला वेढा घालतात. अशातच अचानक हे चोरटे सामान लंपास करतात. अशा प्रकारच्या टोळ्या रेल्वेमध्ये सक्रिय झाल्या आहेत. अलीकडे रेल्वेमधून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मोबाइल चोरी, दागिन्यांची चोरी, बॅगची चोरी अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यात या टोळ्या पटाईत आहेत.
लोहमार्गपोलिस अधीक्षकांचे आवाहन : रेल्वेमध्ये'सॉसी गँग'चे सदस्य काही दिवसांपूर्वी आढळून आले होते. प्रवाशांनी या गँगपासून सतर्क राहून आपले सामान स्वत:पासून दूर ठेवू नये. अशा प्रकारे जर संशयित युवक आढळून आले, तर रेल्वे पोलिसांच्या ९६३७०४२९४७ या नंबरवर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
काही सदस्य गजाआड
पाचते सहा महिन्यांआधी हरियाणा येथील 'सॉसी गँग'मधील काही सदस्यांना रेल्वे पोलिसांनी गजाआड केले होते. त्यानंतर मात्र या टोळीतील चोरट्यांना अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. मात्र, रेल्वेतील पर्स चोरी, मोबाइल चोरी आणि बॅग चोरीच्या घटना कमी झालेल्या दिसत नाही.