आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special 20 Crores Fund To Akola Municipal Corporation

मनपाला २० कोटींचा विशेष निधी; उड्डाणपुलासह हाेणार विविध कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेला२० कोटी रुपयांच्या विशेष निधीसह उड्डाणपूल, मोर्णा ते महान जलवाहिनी टाकण्याची योजना आदी विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. आमदार गोवर्धन शर्मा यांनी ११ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यंमत्र्यांनी घेतलेल्या अकोला जिल्ह्याच्या आढावा बैठकीत विकासाचे मुद्दे लावून धरले.
मुख्यमंत्र्यांनी ११ डिसेंबरला अकोला जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. तब्बल दहा वर्षांनंतर शहराला मंत्रिपद मिळाल्याने डॉ. रणजित पाटील यांच्याकडून नागरिकांच्या
अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या बैठकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. ११ डिसेंबरला झालेल्या बैठकीत आमदार गोवर्धन शर्मा यांनी विकासाचे विविध मुद्दे रेटून
धरले. शहरात उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाकडून २० टक्के निधी देण्यात येईल, विमानतळाचे विस्तारीकरण, अकोला पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे, मोर्णा प्रकल्प ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत २९ कोटी रुपयांच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी, भूमिगत गटार योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करणे, दोन विद्युत उपकेंद्र, शहरासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ९० कर्मचा-यांना कामावर रुजू करून घेणे आदी महत्त्वपूर्ण विषयांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला. उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा वाटा मंजूर केल्याने आता हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा लागणार आहे. तर मोर्णा प्रकल्प ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या कामास मंजुरी मिळाल्याने शहराला पाच
दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने काही महिन्यानंतर का होईना, शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.