आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर गुन्हे थांबवण्यासाठी पाल्यांना योग्य संस्कार द्या;बिपीन बिहारी यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये सोशल नेटवर्किंगचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे, तर त्यावरील गुन्हेदेखील वाढले आहेत. या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी नागरिकांनी घरातूनच पाल्यांना योग्य संस्कार देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी केले. जुने शहरातील डाबकीरोड पोलिस स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी वाढते सायबर गुन्हे या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर ज्योत्स्नाताई गवई, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक शहर विभाग तसेच सर्व पोलिस अधिकारी, शांतता समिती सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
डाबकीरोड पोलिस स्टेशन हे सध्याच्या जुने शहर पोलिस स्टेशनच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे, तर जुने शहर पोलिस स्टेशन राजेश्वर मंदिरासमोरील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आहे. जुने शहराच्या विभाजनासोबतच या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दी ठरवण्यात आल्या आहेत. जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये एकूण 75 नगर आणि ग्रामीण भाग, तर नवीन डाबकीरोड पोलिस स्टेशनमध्ये 63 नगर आणि ग्रामीण भाग, असे विभाजन करण्यात आले असल्याचे पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श यांनी सांगितले. डाबकीरोड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून भारत रक्षसकर यांची, तर जुने शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधीक्षक म्हणून डब्ल्यू. एस.खिल्लारे यांनी पदभार स्वीकारला. रामदासपेठ पोलिस स्थानकाचे प्रभारी अधिकारी म्हणून सुधाकर देशमुख यांनीदेखील पदभार स्वीकारला आहे.