अकोला- दिवाळीमुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या संख्येत चांगलीच वृद्धी होते. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना उद्भवणार्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने यंदा दिवाळीच्या सुट्यांमध्ये विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून, अकोला जंक्शनवर १० रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे.
नियोजित विशेष रेल्वे गाड्यांपैकी पुणे बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ही रेल्वे मंगळवार ३० सप्टेंबरपासून येथील प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली असून, ११ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे. ही गाडी मंगळवारी रात्री ११.४५ वाजता अकोला जंक्शनवर येणार आहे. बिलासपूर पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, १२ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. ही गाडी गुरुवार ००.५० वाजता अकोला जंक्शनवर पोहोचणार आहे, तर ऑक्टोबर रोजी सुरू झालेली ऊधना जं. अमरावती फास्ट पॅसेंजर ही आठवड्यातून सोमवार, मंगळवार शनिवार, अशी तीन दिवस धावणार आहे. ही पॅसेंजर २८ ऑक्टोबरपर्यंत धावणार असून, अकोला जंक्शनवर रात्री २१.२७ वाजता पोहोचणार आहे. तसेच ऑक्टोबरपासून धावणारी अमरावती ऊधना जं. फास्ट पॅसेजर रविवार, मंगळवार बुधवार, अशी तीन दिवस धावणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत धावणारी ही पॅसेंजर अकोला जंक्शनवर सकाळी ८.३० वाजता पोहोचणार आहे. हापा बिलासपूर एक्स्प्रेस ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, २८ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. ही एक्स्प्रेस आठवड्यातून एकच दिवस धावणार असून, बुधवारी सायंकाळी १७.१५ वाजता अकोला जंक्शनवर पोहोचणार आहे, तर बिलासपूर हापा एक्स्प्रेस ते ३० आॅक्टोबर धावणार असून, गुरुवार १९.०५ वाजता अकोला जंक्शनवर पोहोचणार आहे. याव्यतिरिक्त नागपूर पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. ही एक्स्प्रेस बुधवारी दुपारी १४.४० वाजता अकोला जंक्शनवर पोहोचणार आहे. पुणे नागपूर एक्स्प्रेस १६ ऑक्टोबर रोजी पुणे येथून गुरुवारी निघणार असून, गुरुवारी सायंकाळी १७.१० वाजता अकोल्यात पोहोचणार आहे. १९ ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये नागपूर-मुंबई सीएसटी एक्स्प्रेस धावणार आहे. ही गाडी अकोला जंक्शनवर शनिवारी २०.४० वाजता पोहोचणार आहे, तर मुंबई सीएसटी नागपूर एक्स्प्रेस गाडी रविवारी सकाळी ९.४० वाजता अकोला जंक्शनवर पोहोचणार आहे. या विशेष गाड्यांचा लाभ प्रवाशांनी घेण्याचे आवाहन विदर्भ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.