आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिस्थितीशी दोन हात करत घेतली व्यवसायामध्ये भरारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दुधाची विक्री करताना शुभांगी काळे)
अकोला- आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच घडते. असं समजून वागणाऱ्या शुभांगी काळे यांच्या कतृर्त्वानं अनेक महिलांना नवसंजिवनी मिळाली आहे. एक लीटरपासून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसाय आज त्यांनी दिवसाला शंभर लीटरवर नेऊन ठेवला आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांची वृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
शहरात सायकलवर दही विकायचा व्यवसाय करणारे शिवलिंग आप्पा चौधरी यांची सर्वात लहान मुलगी शुभांगी. दोन मोठ्या भावांची ही लहान बहीण. १९८४ साली त्यांच्या आईचे कॅन्सरने निधन झाले, त्या वेळी ती जेमतेम ८-९ वर्षांची हाेती. आईच्या निधनानंतर शुभांगीचे शिक्षण थांबले. दोन-तीन वर्षांनी वडिलांनी दुसरे लग्न केले. पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुलीने हट्ट धरला, मात्र मुलीला शिकवून काय करणार असे लोकांच्या म्हणण्याचा शिवलिंग आप्पा चौधरी यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांनी मुलीला शिकवायचे नाही, असा निर्णय घेतला. पण, शुभांगीने हट्टच धरला आणि त्यांनी अन्न त्याग केले. शेवटी वडिलांनी हात टेकवले आणि महाराष्ट्र कन्या शाळेत नुसता प्रवेश घेऊन दिला. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांनी तिची शिक्षणाची आवड पाहून तिला गणवेश, पुस्तके घेऊन दिली. एवढेच काय, तर जेवणाची सोयदेखील तेच करायचे. दहावीत उत्कृष्ट टक्के मिळवले. बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आणि त्यांचा विवाह कान्हेरी सरप येथील प्रकाश आप्पा काळे यांच्यासोबत झाला.
लग्नानंतर मुलीचे आयुष्य सुखाचे होईल अशा वडिलांच्या आशेवर काही महिन्यांतच पाणी फिरले. सासरी आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी त्यातून मार्ग काढण्याचे काम शुभांगीने केले. पण, जोडीदाराची साथच नसेल तर ती एकटी तरी काय करू शकणार. शुभांगीने शेतमजुरी करायला सुरुवात केली. मात्र, नवऱ्याच्या व्यसनापुढे तिचे काहीच चालले नाही. वडिलांनी जावयाला गाडी घेऊन दिली आणि अकोल्यातील काही घरी दूध देण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे सुचवले. काही दिवस सुरळीत सुरू असलेले कामदेखील त्यांनी सोडून दिले. दरम्यान, त्यांना दोन अपत्ये झाली, वैष्णवी आणि गणाप्पा. लग्नाच्या चार वर्षांनंतर ते अकोल्यात राहायला आले. वडिलांनी भाड्याचे घर घेऊन दिले. घरी दुधाचा व्यवसाय सुरू करून दिला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ‘आया’ म्हणून काम सुरू केले...