आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थिगळांवर लाखो उधळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला - महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. यात १५ कोटी रस्ता निधीतून करण्यात येणाऱ्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. काम सुरू करण्याचा पूर्ण सोपस्कार झाला आहे. केवळ महासभा बोलावली जात नसल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करणे म्हणजे कापड खरेदी केलेला असताना थिगळांवर लाखो रुपये खर्च करण्यासारखाच प्रकार आहे, अशी चर्चा शहरात सुरू आहे.

डांबरीकरणाचे काम मार्गी लागावे, तसेच प्रत्येक रस्त्यांचे काम २५ लाखांपेक्षा अधिक असल्याने प्राप्त झालेल्या निविदांना महासभेची मंजुरी मिळण्यासाठी महासभेकडे पाठवल्या. २१ ऑगस्ट २०१४ ला या निविदांना मंजुरी दिली, तर दुसरीकडे सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पुन्हा निविदा बोलावल्या. अखेर सातव्यावेळी काँकिटीकरणाच्या निविदांना प्रतिसाद मिळाला. परंतु, संबंधित कंत्राटदारांनी १२.९० टक्के अधिक दराने निविदा दाखल केल्या.
कंत्राटदाराशी निगोसिएशन केल्यानंतर केवळ ०.४० टक्के दर कमी करण्यात आला. सहाही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम १२.५० टक्के अधिक दराने करावे लागणार असल्याने या निविदांना मंजुरी मिळण्यासाठी महासभेकडे पाठवण्यात आले. महासभेने मंजुरी दिल्यानंतर या सहा रस्त्यांचे काम सुरू केले जाणार आहे. परंतु, महासभाच होत नसल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण रखडले आहे. त्यामुळे एकीकडे काँक्रिटीकरणाचा सर्व मार्ग मोकळा झाला असताना केवळ अंतर्गत राजकारणामुळे या सहा रस्त्यांचे काम रखडले आहे. स्थगित सभा बोलावून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा मार्ग मोकळा करता रस्ते अनुदानातून पॅचिंगचे काम हाती घेतले. काँक्रिटीकरण रस्त्यावरील पॅचिंगच्या कामावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
या निधी अंतर्गत १२ रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. यापैकी तीन रस्त्यांचे डांबरीकरणही रखडले आहे. दीपक चौक ते मालधक्का, अब्दुल हमीद चौक ते अग्रसेन चौक आणि जुना बाळापूर रोड ते डाबकी रोड जकात नाका (कॅनॉल) या मार्गाचे डांबरीकरणाचे काम रखडले आहे. हे रखडलेले काम सुरू करण्याबाबत सत्ताधारी अथवा विरोधकांनी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. शहरविकासाच्या दृष्टीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

विकासाचे काहीच देणे-घेणेच नाही
केवळगटबाजीच्या राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला आहे. गटा-तटाच्या राजकारणात नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार सत्ताधारी गटाला नाही. याचा हिशोब आता सर्वसामान्य नागरिकच करतील. साजिदखानपठाण, विरोधी पक्ष नेता

केवळ इच्छा शक्तीचा अभाव
शहर विकासासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, केवळ अंतर्गत कलहामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सत्ताधारी गटाकडून होत आहे. इच्छाशक्तीच्या अभावामुळेच विकासाची कामे थांबली आहेत. रफिक सिद्दीकी,माजी उपमहापौर

लवकरच निर्णय, महासभा बोलवू
महापालिकेच्यासर्व सदस्य तसेच गटनेत्यांशी चर्चा करून लवकरच स्थगित महासभेची तारीख निश्चित केली जाईल. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. उज्ज्वला देशमुख,महापौर

लोक प्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष
अंतर्गतकलहामुळे सभा स्थगित होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. परंतु, अद्यापही सभा बोलावली नाही. दूर्देवाने खासदार, आमदार यांनीही ही स्थगित सभा बोलावण्याबाबत पुढाकार घेतला नाही. विशेष म्हणजे भाजपचेच खासदार, आमदार आणि महापौर आहेत.
रस्त्यावर किती खड्डे आहेत? याचा अहवाल घेता पॅचिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदार सांगेल तेवढे काम त्याने केले, ही बाब प्रशासनाला मान्य करावी लागणार आहे.
निधी मंजूर करून २० महिन्यांचा कालावधी झाला असताना अद्यापही सहा रस्त्यांचे काँक्रिटिकरण आणि तीन रस्त्यांचे डांबरीकरण रखडले आहे. कंत्राटदारांनी १२.९० टक्के अधिक दराने निविदा दाखल केल्या. विलंब झाल्यास, बांधकाम साहित्य किमतीत वाढ झाल्यास अधिक दराने निविदा दाखल होण्याची शक्यता.

अडथळा दूर करण्याऐवजी पॅचिंगला प्राधान्य दिले जात आहे. रस्ते अनुदानातून ५० लाख रुपये खर्च पॅचिंगसाठी करण्यात येणार आहे. आतापर्यंत पॅचिंगच्या कामाची ३७ लाख रुपयांची देयके काढण्यात आली आहेत.

- अशोक वाटिका ते सरकारी बगिचा -१ कोटी ३९ लाख
- दुर्गा चौक ते अग्रसेन चौक -९५ लाख ५१ हजार
- पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चौक -१ कोटी १५ लाख
- टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक -१ कोटी १५ लाख
- रुंगटा पेट्रोल पंप ते देशपांडे यांचे घर -५६ लाख
- माळी पुरा चौक ते मोहता मिल -१ कोटी १२ लाख
- ऑक्टो. २०१३ शासनाकडूननिधी मंजूर
- मे२०१४ १८रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी
- जून२०१४ १८कामांच्या निविदा प्रसिद्ध
- जुलै२०१४ निविदाउघडल्या. परंतु, सिंगल निविदांमुळे फेर निविदा बोलावण्याचा निर्णय.
- जुलै२०१४ दुसऱ्यांदानिविदा बोलावल्या
- २३जुलै २०१४ १८पैकी कामांना प्रतिसाद
- २७जुलै २०१४ तिसऱ्यांदादहा रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध
- १४ऑगस्ट २०१४ १०पैकी कामांच्या िनविदांना प्रतिसाद
- २०ऑगस्ट २०१४ सहारस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी चौथ्यांदा निविदा
- २१ऑगस्ट २०१४ डांबरीकरणाच्याकामांना महासभेत मंजुरी
- १४ नोव्हें २०१४ निविदांनाप्रतिसाद नाही
- १५जाने २०१५ काँक्रिटीकरणासाठी पाचव्यांदा निविदा
- १२फेब्रु. २०१५ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निविदा लोड होऊ शकल्या नाहीत. पुन्हा फेर निविदा
- मार्च२०१५ तांत्रिककारणांमुळे निविदा रद्द
- ३१मार्च २०१५ काँक्रिटीकरणासाठी सातव्यांदा निविदा प्रसिद्ध
- एप्रिल२०१५ निविदाउघडल्या. १२.९० टक्के अधिक दराने निविदा प्राप्त
- २०एप्रिल २०१४ कंत्राटदारासोबत निगोसिएशन ०.४० टक्के दर कमी करण्याची तयारी
- २०मे २०१५ प्रशासनाकडून महासभेकडे प्रस्ताव दाखल
- २७मे २०१५ महासभेचे आयोजन, प्रस्तावाचा समावेश परंतु, स्थगितसभेसाठी मुहूर्तच मिळेना.
बातम्या आणखी आहेत...