आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रीडा संकुलांचा चालला ‘खेळ’,अकोला तालुक्यात जागेचा प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासनाने १९९६ मध्ये राज्य, जिल्हा तालुका क्रीडा संकुलांची संकल्पना अमलात आणली. मात्र, तिचा लाभ २०१४ उजाडले, तरी अद्याप ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळाला नाही. अकोला बाळापूर तालुक्यात, तर अद्याप क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्नच निकाली निघालेला नाही. इतर तालुक्यांतील क्रीडा संकुलांचे काम अर्धवट आहे. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलांचा प्रश्न कधी मिटणार? असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे.

अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, पातूर, बार्शिटाकळी, बाळापूर अकोला, असे सात तालुका क्रीडा संकुल अपेक्षित असून, त्यापैकी केवळ मूर्तिजापूरला तालुका क्रीडा संकुलाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. मात्र, इतर तालुका क्रीडा संकुलांची अवस्था दयनीय आहे. वसंत देसाई क्रीडांगणावर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले असून, लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण, क्रीडा प्रबोधिनीचाही पर्याय शहरी खेळाडूंना उपलब्ध आहे. मात्र, तालुका स्तरावर अद्याप क्रीडा सुविधांची वानवा आहे. पूर्वी तालुका क्रीडा संकुलांसाठी लाख इतका निधी होता. मात्र, २००१ च्या क्रीडा धोरणात तो वाढवून २५ लाख करण्यात आला. त्यानंतर २००९ च्या धोरणानुसार तो एक कोटीपर्यंत वाढवण्यात आला. एक कोटी रुपये निधी खर्चून जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी क्रीडाविषयक मूलभूत सुविधा निर्मितीची संकल्पना आहे. मात्र, ती अस्तित्वात उतरवल्याने त्याचा लाभ खेळाडूंना झालेला नाही. अकोला तालुक्यासाठी जागाच उपलब्ध झाली नव्हती. आता नुकतीच बोरगावमंजू येथील एक जागा तालुका क्रीडा संकुलासाठी निश्चित केली असली, तरी ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

कामांचा पाठपुरावा सुरू
तालुकाक्रीडा संकुलांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे सुरू असून, ती चालू वर्षात पूर्ण होतील, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पाठपुरावा करत - आहे. '' शेखरपाटील, िजल्हाक्रीडा अधिकारी, अकाेला.