आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये होणार वाहकाकडून प्रवाशांच्या स्वागताची उद्घोषणा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एसटी महामंडळाने प्रवासी वाढवण्यासाठी विमानाप्रमाणे एसटी बसमध्ये प्रवाशांच्या स्वागताची उद्घोषणा करण्याचा निर्णय घेतला आह़े उद्घोषणेची जबाबदारी वाहकावर (कंडक्टरवर) सोपवण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाकडून प्रवासी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. सोमवार ते शनिवारदरम्यान, प्रवासी सत्कार, प्रवाशांच्या सूचना, कर्मचार्‍यांचे स्वागत तसेच विनाबिघाड बस वाहतूक व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे प्रवासी संख्या वाढवून एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी यंत्रणा काम करत असताना आता उद्घोषणा करण्याची जबाबदारीही कंडक्टरकडे सोपवण्यात आली आह़े एसटी महामंडळाने जारी केलेल्या नवीन सूचनांमध्ये, संबंधित कंडक्टराने एसटीत प्रवासी बसल्यानंतर गाडी निघण्याच्या काही मिनिटेआधी ही उद्घोषणा करायची आह़े ‘नमस्कार, मी एसटी कंडक्टर आपले एसटी बस सेवेत सहर्ष स्वागत करत आह़े.़.’ अशी उद्घोषणा एसटी बसमध्ये ऐकण्यास मिळाल्यास चकित होऊ नका. याशिवाय ‘एसटी कंडक्टरला, कृपया लक्ष द्या, पासून मी एसटी कंडक्टर आणि माझे सहकारी ड्रायव्हर या गाडीत आहेत,’ असे सांगावे लागणार आहे. सुरुवातीचे काही सीट आरक्षित असून, यात आमदार, महिला आणि ज्येष्ठांना आरक्षणाची माहिती द्यावी लागणार आहे. संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग कोणत्या ठिकाणी आहे, हेही कंडक्टर सांगेल. ही बस या थांब्यावर थांबेल, स्टँडवर बस पोहोचल्यानंतरही कंडक्टर उद्घोषणा करतील. त्यात आपले राहिलेले सुटे पैसे माझ्याकडून घेऊ न जावेत, असे आवाहन कंडक्टर आता करणार आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाने कंडक्टरमार्फत उद्घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्घोषणेला पाच मिनिटांचा अवधी लागणार असून, यात कंडक्टरने प्रवासी गोळा करावेत की, उद्घोषणा करावी, असा प्रश्न कंडक्टर समोर निर्माण झाला आहे.
प्रवाशांसाठी सोयीस्कर
एसटी प्रवास प्रवाशांसाठी सोयीस्कर व्हावा, म्हणून एसटी कंडक्टर उद्घोषणा करणार आहे. त्यामुळे प्रवाशाला माहिती होईल. प्रवाशांच्या फायदाचा हा निर्णय आहे. त्याच्या अंमलबजावणीला लवकरच प्रारंभ होईल.
-ए. एम. शेंडे, आगारप्रमुख, अकोला.