आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्रीपासून एसटी बसची होणार भाडेवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भाडे दरात शनिवार, 31 मेच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ होणार आहे. ही भाडेवाढ 2.48 टक्क्यांची असून, प्रवाशांना आणखी महागाईचा सामना करावा लागणार आहे. एसटी महामंडळाने शुक्रवार, 30 मे रोजी 2.48 टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ 31 मेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याने प्रवाशांच्या खिशावर चांगलाच भार पडणार आहे. ही भाडेवाढ पहिल्या दोन टप्प्यांत लागू होणार नसल्याने नागरिकांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने दिला असला, तरी या नंतरच्या टप्प्यांसाठी 15 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. रात्र सेवेत ही भाडेवाढ 7.15 टक्क्यांहून 7.35 टक्के करण्यात आली आहे, तर निमआराम बस सेवेमध्ये 8.30 टक्क्यांहून 8.45 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
डिझेलच्या दरवाढीमुळे भाड्यात वाढ
डिझेलच्या दरवाढीमुळे एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. डिझेलची ही भाडेवाढ प्रवाशांवर महागाईचा जास्त भार पडू नये या अनुषंगाने करण्यात आली आहे.’’ ए. एम. शेंडे , बसस्थानक व्यवस्थापक