आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एसटी’समोर दहा दिवसांत 55 लाखांचे उद्दिष्ट; विभागातून सोडल्या जाणार 162 गाड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - आषाढीनिमित्त जिल्ह्यातून हजारो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. यिा भाविकांना अधिक सुविधा व्हावी, या अनुषंंगाने जिल्ह्यातून जवळपास 162 एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. यादरम्यान प्रमुख 10 दिवसांत एसटी विभागाला सुमारे 55 लाखांचे उद्दिष्ट दिले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील विविध 13 तालुक्यांतून दरवर्षी 40 हजारांवर भाविक आषाढीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी जातात. बुलडाणा व चिखलीतील काही पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या पालखीसोबत अनेक दिंड्या आहेत, ज्यात शेकडो भाविक आहेत. दुसरीकडे याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील हजारो भाविक एसटी बसने प्रवास करतात. या भाविकांना सुविधा मिळावी, या हेतूने बुलडाणा विभागातर्फे यंदा 162 एसटी बसचे नियोजन केले आहे. 9 जुलै रोजी आषाढी एकादशीमुळे भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 ते 14 जुलैदरम्यान जाणार आहेत. यासाठी 1 जुलैच्या आधीपासून येथील बसस्थानकावरून पंढरपूरकडे जाणार्‍या बससाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. या 10 दिवसांत एसटी विभागाने चालक-वाहकांना 55 लाखांचे उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षी एसटीने 55 लाखांवर उत्पन्न मिळवले होते.
गावात पोहोचणार एसटी बस : जिल्ह्यातील एखाद्या गावातून 50 किंवा यापेक्षा अधिक भाविक एकाच दिवशी पंढरपूरला जाणार असतील तर एसटी विभागाच्या वतीने त्या गावापासून ते पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांना दर्शनानंतर वापस यावयाचे असल्यासदेखील अशी सुविधा देण्यात येणार आहे.