आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ST Corporation Will Travel A Focus On The For Fairs!

एसटी महामंडळ करणार यात्रा-जत्रांवर लक्ष केंद्रित!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-सध्या सर्वत्र यात्रा-जत्रांचा काळ सुरू झाल्याने एसटीने तो कॅश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला शह देण्यासाठी, उत्पन्न वाढीसाठी एसटीने भाविकांकडे लक्ष केंद्रित केले. त्यानुसार एसटीने भाविकांच्या गावात सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीचे अधिकारी सरपंचांच्या भेटी घेणार आहेत. एसटीच्या संकेतस्थळावरही मार्केटिंगचा हायटेक फंडा राबवण्यात येणार आह़े
एसटीच्या कमी होणार्‍या भारमानाच्या पार्श्वभूमीवर आगारांना यात्रा काळात गावांना सेवा देण्याचे नियोजन केले आहे. आगार व्यवस्थापक, स्थानकप्रमुख, वाहतूक नियंत्रकांवर गावाच्या भेटीची जबाबदारी सोपवली आहे. तालुक्यातील ग्रामदैवत, त्यासाठीचा भारमानाचा डेटा आगाराना जमा करावा लागणार आहे. यात्रा काळात प्रवासी खासगी वाहतुकीचा आधार घेत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने गावातूनच भाविकांना सेवा दिली जाणार आहे. चालक, वाहकासह अधिकार्‍यांची नेमणूक सेवेसाठी केली आह़े प्रत्येक बसपोटी 12 हजारांचे उत्पन्न मिळण्यासाठी भाविकांच्या दारात सेवेचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची संख्या, तिकिटाचे पैसे दिल्यानंतर अधिकारी एसटीची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत़ गर्दीच्या वेळी जादा बसेसची सेवाही पुरवण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे भाविकांना दारातून सेवा मिळणार असून, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रवासीभिमुख सेवा
अधिकाधिक प्रवासीभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न आहे. विनाअपघात आणि सुरक्षित सेवा एसटीचे वैशिष्ट्य आहे. उत्पन्नासह या उपक्रमांमुळे एसटीची विश्वासार्हता वाढणार आहे. प्रवाशांकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.’’ ए. एम. शेंडे, आगारप्रमुख, अकोला