आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटीला सवलत योजनांचे जड झाले ओझे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्य शासनाकडून समाजातील विविध घटकांना प्रवास भाड्यात देण्यात येणारी सूट एसटी प्रशासनासाठी बोजा ठरत आहे. शासनाकडे थकित असलेल्या सवलत रकमेत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली असून, त्या तुलनेत राज्य सरकारकडून एसटीला परतावा मिळाला नाही़ सवलतीच्या योजनांचे पैसे मिळण्यात दिरंगाई होत असल्याने एसटी प्रशासन त्रस्त आहे.

मागील पाच वर्षांत या सवलतीच्या रकमेचा आकडा भलताच वाढला आह़े त्यामुळे एसटीला सवलत योजना अवजड ठरत आहेत़ एसटी महामंडळाने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आह़े 2008-09 मध्ये सवलतीची रक्कम 591.51 कोटी रुपये होती़ तीच रक्कम 2012-13 मध्ये 1,064.18 कोटींवर जाऊ न पोहोचली आह़े सवलतीचे पैसे भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आह़े मात्र, योजनेचा लाभ घेतला जात असताना, त्याचा परतावा मात्र मिळत नसल्यामुळे सवलत योजना राबवणे एसटीला कठीण झाले आह़े सन 2008 पासून 2013 पर्यंत या सवलतीच्या रकमेत वाढ झाली आह़े राज्य सरकारकडून सवलतीच्या दरापोटी एसटीला मिळणारे पैसे अजूनही मिळालेले नाहीत़ ते कधी मिळणार याकडे महामंडळाचे लक्ष लागून आह़े

यांना मिळते सूट: शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, क्षयग्रस्त, विविध पुरस्कार विजेते, पत्रकार यांना सामाजिक बांधीलकीतून एसटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. कोणाला तिकिटाच्या 50 टक्के, तर कोणाला शंभर टक्के सवलत आह़े