आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या बोगस कार्डधारकांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटीत सवलत घेणार्‍या ठगांचा समाजकल्याण विभाग शोध घेत असून, यासाठी राज्य परिवहन विभाग, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अभियान सुरू करण्यात आले आहे. अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे बस प्रवासासाठी सवलत घेणार्‍यांची संख्या जास्त असल्याचे भरारी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान समोर आले आहे. एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी अपंग प्रमाणपत्राचा आधार घेणार्‍यांची संख्या जिल्ह्यात कमी नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपंग विभागामार्फत अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येते. मात्र, एसटी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बरेचजण बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवास करत असल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

अकोट, तेल्हारा ‘टार्गेट’

जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यात बोगस प्रमाणपत्राचा आधार घेऊन एसटीला चुना लावणार्‍या ठगांची संख्या अधिक आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रथमत: या तालुक्याकडे अधिक लक्ष वेधले जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सवलत घेणार्‍यांना चाप बसणार आहे.

पथके कार्यान्वित

जिल्हायात बोगस प्रमाणपत्रधारकांची शोधमोहीम सुरू केली आहे. याकरिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.’’ उमेश देशमुख, समाजकल्याण अधिकारी, अकोला.

शोधमोहीम सुरूच असते

बोगस प्रमाणपत्रधारक दिवसेंदिवस समोर येत आहेत. याकरिता बर्‍याच वर्षांपासून अशा भामट्यांचा एसटी महामंडळ शोध घेत असते.’’ प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक, अकोला