आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध हातभट्टी विरोधात कारवाईस झाला प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मालवणी येथील विषारी दारू प्राशन केल्याने फार मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याची दु:खद घटना घडलेली आहे. अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती भविष्यामध्ये घडू नये, यासाठी जिल्ह्यातील अवैध मद्य हातभट्टी दारू निर्मिती विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातून सर्व प्रकारचे अवैध मद्य व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. यादृष्टीने पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्यासोबत बैठक घेतली असून, सर्व पोलिस निरीक्षकांना कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अवैध मद्य व्यवसायाला आळा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. हातभट्टी दारू निर्मिती, विक्रीबाबतची तक्रार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे करा. गावात कोणत्याही व्यक्तीने घरात, दुकानात, प्रतिष्ठानांमध्ये अवैध मद्य विक्री करू नये, असे आढळल्यास होणाऱ्या कारवाईस स्वत: जबाबदार राहाल. कोणाचाही हस्तक्षेप कारवाईदरम्यान सहन करून घेतला जाणार नाही. अवैध मद्य विक्रीविरोधात प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेस प्रत्यक्ष संपर्क करून सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

प्रशासनाची हेल्पलाइन :{जिल्हाधिकारी 9921044466 {पोलिस अधीक्षक 7507911911 {अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 9657068880
बातम्या आणखी आहेत...