आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर संशोधन केंद्राचा प्रश्न लागला मार्गी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हारुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेता २०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय कॅन्सर आजाराच्या निदानासाठी टी. बी. रिसर्च सेंटर निर्मितीच्या कार्यास गती मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जुलै रोजी आरोग्य अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या समस्या सूचना केवळ कागदावर नोट करून घेता थेट आरोग्य मंत्री आरोग्य संचालकांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून ऑनस्पॉट निर्णयही दिले.

पालकमंत्री डॉ. पाटील यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्य विभागाच्या विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये डॉक्टरांची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समजले. कंत्राटी स्वरूपात डॉक्टरांची पदे भरून रुग्णसेवा केली जात असल्याचे उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी सांगितले. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी िदल्या. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत संचालक डॉ. सुभाष पवार यांच्याशी थेट चर्चा करून विविध प्रश्न निकाली लावले. बैठकीला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी कल्पना सुरवाडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्वतंत्रकॅन्सर रुग्णालय
शिवापूरभागात स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय होत आहे. या ठिकाणी १० हजार स्क्वेअर फूट जागेवर बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. ही जागा भविष्याचा विचार करता कमी पडणार असल्याने त्यात वाढ करून आणखी २.६ हेक्टर जमिनीची मागणी शासनाकडे करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शिर्लायेथे ग्रामीण रुग्णालय
पातूरतालुक्यात शिर्ला अंधारे येथे ३.५ हेक्टर जागेवर ग्रामीण रुग्णालय होत आहे. निधीसुद्धा प्राप्त आहे. मात्र, एसडीओंकडून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने करावी. त्यानंतर त्यावर बांधकाम करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बोरगावलाहीग्रामीण रुग्णालय
बोरगावयेथे सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे प्रस्तावित आहे. यासाठी सध्या ताब्यात असलेली २.५ हेक्टर जागा कमी पडत आहे. ती वाढवून घ्यावी, अशी सूचना डॉ. रणजित पाटील यांनी केली.

जिल्हा रुग्णालय होणार २०० खाटांचे
पाचमहिन्यांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिनस्थ १०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर झाला होता. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी उपसंचालकांसोबत चर्चा करून हा प्रस्ताव २०० खाटांचा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी ३.६ हेक्टर जागासुद्धा कमी पडेल म्हणून आणखी हेक्टर जागा शासनाकडे अतिरिक्त मागवण्यात येणार आहे.