आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक: ‘बीएचआर’ची चौकशी सुरू, कोट्यवधी रुपयांनी ठेवीदारांना घातला गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आयुष्याची सर्व पुंजी दोन-तीन टक्के जादा व्याजासाठी पतसंस्थांमध्ये ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेने मोठा झटका दिला आहे. रायसोनी पतसंस्था ठेवी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान, अर्थमंत्री, केंद्रीय कृषी सहकार खात्याच्या सचिवांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले. सचिवांशी झालेल्या चर्चेत या प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर खात्यातर्फे चौकशी सुरू असून, तिचा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल, असे ठेवीदारांच्या शिष्टमंडळास सांगण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांची तीन कोटी १५ लाख रुपयांनी फसवणूक पतसंस्थेने केली आहे. त्याबदल्यात सिटी कोतवाली पोलिसांनी मे रोजी पतसंस्थेला चांगलाच हिसका दाखवत शहरातील पाच कोटी रुपयांची पतसंस्थेची संपत्ती जप्त केली आहे. पतसंस्थेच्या व्यवस्थापनास चौकशीसाठी दिल्लीत बोलावले असता व्यवस्थापनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात व्यवस्थापनाने मुदत संपल्यावर ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ हजारो ठेव पावत्याही सादर केल्या. त्यांची छाननी सुरू असल्याचे समितीच्या सदस्यांना सांगण्यात आले. हा प्रश्न खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अशोक चव्हाण यांनी संसदेत उपस्थित केला आहे. या पतसंस्थेने अकोल्यामध्ये शाखा सुरू केल्यानंतर सुरुवातीला ऑटोरिक्षावर जाहिराती केल्या. त्यावर पतसंस्थेचा लोगो झाड दाखवण्यात आले. कोणत्याही बँकेचा ठेवींवरील व्याजदर नऊ टक्क्यांपेक्षा जास्त नसताना १३-१४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांच्या आयुष्याच्या पुंजीवर अक्षरश: दरोडा घालण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
कारभार दिल्लीतून
‘मल्टिस्टेट’चेकार्यालय दिल्लीत आहे. ते केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. विशेष म्हणजे, संपूर्ण देशाचा ‘मल्टिस्टेट’चा कारभार जेथे चालतो, तेथे अवघे २५ कर्मचारी काम करतात. ‘मल्टिस्टेट’ संस्थेबद्दल तक्रार करण्यासाठी गेलेल्या सामान्यांना तेथे कोणीही दाद देत नाहीत. कार्यालय थेट दिल्लीतच असल्यामुळे तक्रार दिल्लीला जाऊनच करावी लागते. म्हणजे केंद्र सरकारनेच या लोकांना लुटीचा परवाना दिल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून वाचा...मल्टिस्टेटचा भूलभुलैया...ठेवी असुरक्षित?
बातम्या आणखी आहेत...