आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Transport Corporation Staff Residential Coloney In Bad Condition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य परिवहन महामंडळाच्या निवासस्थानाची दुरवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - येथील धाड - अजिंठा रस्त्यावर उभारलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, याकडे मंडळाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान सुविधांचा अभाव जाणवत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहे.
येथील धाड रोडवर एसटी महामंडळाने आपल्या कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारली आहेत. या निवासस्थानामध्ये अधिकारी व कर्मचारीच राहतात. चालक व वाहकांना निवासस्थाने दिल्या जात नाही. पर्यवेक्षकीय कर्मचारी व अधिकारी यांनाच अग्रक्रमाने जागा दिली जाते. दोन इमारतीमध्ये ही जागा विभागलेली आहे. एकूण 12 निवासस्थाने या जागांमध्ये बांधण्यात आली आहे. विभाग नियंत्रकाचे निवासस्थान वेगळे आहे. या निवासांपैकी फक्त नऊ निवासातच सध्या अधिकारी राहतात. तीन निवासस्थाने अजूनही रिकामेच आहेत. खरेतर जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी कर्मचारी व अधिकारी यांची निवासस्थाने अधिक प्रमाणात असायला हवी होती मात्र ती नाहीत. जी आहेत त्याचीही दुर्दशा झाली आहे. या निवासस्थानाचे प्लास्टर निघत आहे. 20 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या निवासस्थानांमध्ये पुरेशी व्यवस्थाही नाही. ही व्यवस्था पुरविण्यासाठी महामंडळाने प्रयत्नही केलेले नाही. त्यामुळे अधिकारी या ठिकाणी राहायलाच तयार नाही.


सुरक्षा रक्षकही नाही
बारा निवासस्थान असलेल्या या निवासात भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली होती. अधिकारी व पर्यवेक्षक सकाळी कामावर निघून गेल्यानंतर घरी फक्त महिलाच राहतात. अशावेळी चोरीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे. तसेच येथे सांडपाण्याची व्यवस्थाही नाही. संडासाचे टाके चोकअप झाले आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे.


विकासात निधीची अडचण
महामंडळाच्या निवासस्थानाची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर व नियमांची पुर्तता झाल्यास निवासस्थानाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करु.’’ चंद्रकांत बोरसे, विभागीय नियंत्रक बुलडाणा