आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान-तंत्रज्ञानाने व्यापले आपले जीवन- उपशिक्षणाधिकारी मानकर यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपले जीवन व्यापले असून, आजची जीवनपद्धती ही वैज्ञानिक विकासामुळेच निर्माण झालेली असल्याचे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.
न्यू इंग्लिश हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान मंच प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरुण शेगोकार, प्रा. यादव वक्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधन यावर प्रा. संजय देव्हडे यांनी, तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा तयारी यावर शशिकांत बांगर, पर्यावरण संवर्धनावर उमेश रेळे, सर्पज्ञान यावर धम्मपाल इंगळे, प्रा. यादव वक्ते यांनी भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, प्रा. रवींद्र भास्कर यांनी चला प्रयोग करू या तासिकेत रसायनशास्त्राचे प्रयोग करून दाखवले नंतर विद्यार्थ्यांनी प्रयोग केले. ओम चक्रे यांनी गणितातील संकल्पना विशद केल्या.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अहवाल वाचन प्रा. रवींद्र भास्कर यांनी केले, तर संचालन उमेश रेळे यांनी केले. प्राचार्य दत्तात्रय कदम यांनी आभार मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शशिकांत बांगर, श्रीकांत रत्नपारखी, अनिल मसने, विनोद देवके, विश्वास जढाळ, विलास घुगड, संतोष जाधव, सुनील वावगे, धम्मदीप इंगळे, एम. एम. तायडे, व्ही. वाय. पजई, सुरेश डोंगरे, आर. एस. धर्मे, एम. डी. कापडे, सचिन पाटील, एस. आर. भारसाकळे, पी. बी. भोकन, आर. बी. पवार, संजय जोशी यांनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...