आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Statue Of Unity, Still Give To Sardarbhai Patel Statue

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’: लोहपुरुषांचा पुतळा; अकोल्यातून जाणार लोखंड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गुजरात येथे उभारण्यात येत असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी राज्यातील प्रत्येक गावागावांतून लोखंड जमा करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातूनही या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी लोखंड जाणार असून, त्यासाठी प्रत्येक गावामधून लोखंड गोळा करण्याची मोहीम भाजपच्या वतीने राबवण्यात येत आहे. गुजरातमध्ये सरदार सरोवराच्या काठावर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ हा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्यासाठी देशातून प्रत्येक गावातून एक-एक किलो लोह जमा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातूनही यासाठी प्रत्येक गावागावांतून शेतकर्‍यांनी दिलेले लोह जमा करण्यात येणार आहे. जमा केलेले हे लोखंड गुजरातमध्ये पाठवण्यात येईल. लोखंड वितळवून त्याचा वापर पुतळयासाठी करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातूनदेखील गावागावांतून एक किलो लोखंड जमा करण्यात येत असून, त्यासाठी जिल्हा स्तरावर तयारी सुरू झालेली आह़े अकोला जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भात पुतळ्यासाठी लोखंड जमा करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळे आदींनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असून, लोखंड जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

मुंबईच्या फेरीसाठी तयारी केली सुरू
मुंबईत डिसेंबरमध्ये एका फेरीचे आयोजन केले असून, या यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘गाव चलो अभियान’ राबवण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथ लेव्हल वरून दहा कार्यकर्ते या फेरीमध्ये सहभागी होणार असून, जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाण्यासाठी नियोजन करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी सांगितले.