आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायीसमिती सदस्य निवड प्रक्रियेवर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाबाबत उत्सुकता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने या प्रकरणात विभागीय आयुक्त नेमका कोणता निर्णय घेतात? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रशासनाने सदस्य निवडीनंतर स्थायी समिती सभापती निवडणुकीचा प्रस्तावही विभागीय आयुक्तांकडे दाखल केल्याने या दोनपैकी कोणत्या निर्णयाच्या बाजूने आयुक्त निर्णय देतात? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. २४ एप्रिलला याबाबत निर्णय दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू असल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थायी समिती सदस्य निवडीचा गुंता सुटला. परंतु, त्यानंतरही एकाच वेळी १६ सदस्य निवडायचे की, आठ-आठ निवडायचे? याबाबतही खलबते सुरू होती. अखेर विधिज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर आठ-आठ सदस्यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. जे आठ सदस्य आधी निवडले गेले, त्यांचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपुष्टात येणार आहे. १६ सदस्यांची निवड झाल्यानंतर स्थायी समिती सभापती निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केल्या गेली होती. परंतु, स्थायी समिती सदस्यांची निवड करताना नियमांना डावलण्यात आले. पक्षीय बलानुसार अकोला शहरविकास महासंघाचा एक सदस्य स्थायी समितीत जाऊ शकतो. परंतु, हेतूपुरस्सरपणे ही निवड केली नाही, असा आरोप महासंघाचे गटनेते सुनील मेश्राम यांनी केला. या अनुषंगाने त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रारही दाखल केली. दरम्यान, प्रशासनाने एकूण १६ सदस्यांची निवड झाल्यानंतर स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल केला.
परंतु, अद्याप विभागीय आयुक्तांनी सभापती निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही, तसेच सुनील मेश्राम यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर निर्णय दिलेला नाही. सुनील मेश्राम यांचा दावा विभागीय आयुक्तांनी मान्य केल्यास पुन्हा एक सदस्याच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी लागेल. विभागीय आयुक्तांनी अद्याप कोणताही निर्णय दिल्याने या प्रकरणात विभागीय आयुक्त नेमका कोणता निर्णय देतात? याबाबत नगरसेवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.